29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमुंबईदिवाळीआधी भारताची दिवाळी; जीएसटीतून मिळाले 1.72 लाख कोटी

दिवाळीआधी भारताची दिवाळी; जीएसटीतून मिळाले 1.72 लाख कोटी

विविध करांतून देशाची आर्थिक स्थिती मजबूत होते. ऑक्टोबर 2023 साठी भारताच्या वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलनाने विक्रमी उच्चांक गाठला, जो एप्रिल 2023 नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन आहे. एकूण जीएसटी महसूल 1.72 लाख कोटी रुपये आहे, जी वर्षभरात 13 % ची वाढ दर्शविते. केंद्राच्या वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आलेली आहे. जीएसटी महसुलातील वाढ ही केवळ देशांतर्गत व्यवहारांपुरती मर्यादित नाही. सेवांच्या आयातीसह देशांतर्गत व्यवहारांच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढली आहे.

भारतात दिवाळीला अवघे काही दिवस उरलेले असताना देशवासीयांना चांगली बातमी मिळाली आहे. भारताचे एकूण जीएसटी महसूल 1.72 लाख कोटी रुपये आहे, जी वर्षभरात 13 % ची वाढ दर्शविते. मोठ्या प्रमाणात जीएसटी संकलन करणे हे 2023-24 या आर्थिक वर्षातील वाढीव महसुलाच्या व्यापक प्रक्रियेचाच एक भाग आहे. सरासरी सकल मासिक जीएसटी संकलन आता 1.66 लाख कोटी रुपये आहे, जे दरवर्षी 11 टक्क्यांनी वाढले आहे.

ऑक्टोबरमध्ये युपीआय व्यवहारातून 11.41 अब्ज, उत्पादन खरेदी व्यवस्थापनाचा निर्देशांक (पीएमआय) 55.5 टक्के आहे. सेवा पीएमआय 58.4 टक्के, कोळसा उत्पादन 78.65 मेट्रिक टन आहे. रेल्वे मालवाहतूक 129.03 मेट्रिक टन, इलेक्टरीसिटी वापर 138 अब्ज यूनिट, देशांतर्गत हवाई वाहतूक 1.26 कोटी आहे.

पीएमआय म्हणजे काय भाऊ?
खरेदी व्यवस्थापनाचा निर्देशांक (पीएमआय) हे उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील व्यवसायाची क्रिया दर्शवणारा एक संकेतांक आहे. परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (Purchasing Managers Index) किंवा (PMI) हा आर्थिक निर्देशक आहे, जो वेगवेगळ्या कंपन्यांच्या मासिक सर्वेक्षणानंतर काढला जातो.

निर्देशांक उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रातील कल दर्शवितो. खरेदी व्यवस्थापकांद्वारे पाहिल्याप्रमाणे बाजाराची परिस्थिती विस्तारत आहे, करार करत आहे किंवा तशीच राहिली आहे की नाही हे निर्धारित करण्यात निर्देशांक मदत करतो. हे वर्तमान आणि भविष्यातील व्यवसाय परिस्थितीशी संबंधित माहिती प्रदान करण्यासाठी वापरले जाते.

हे सुद्धा वाचा
अंबानींना धमकी देणारे आहेत तरी कोण?
रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील रासायनिक कारखाने झाले जीवघेणे
श्रमेश बेटकरच्या रक्तरंजित पत्रावर हेमांगी कवी काय म्हणाली?
दरम्यान दरडोई उत्पन्नात वाढ/घट आठ वर्षातील आकडेही समोर आले आहेत. त्यानुसार चीनचे दरडोई उत्पन्न 88 %, भारताचे 57%, रशिया 5%, जर्मनी 1%, यूके 1% फ्रान्स 5% आहे. केंद्रातील सरकार फक्त मंदिराचे राजकारण करत आहे. अशी ओरड विरोध करत असतात. असे असताना भारत विविध क्षेत्रात प्रगती करत असल्याचे हे चिन्ह मानण्यात येते.

2023 च्या मध्यात भारताचा आर्थिक वेगाने विस्तार सुरू आहे. भारताच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2023 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत 6.1% वाढीच्या तुलनेत 2023 च्या एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जिडीपी वाढीचा दर 7.8% च्या वेगाने वाढला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी