28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा सेवा संघाचे काम तळागाळापर्यंत जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज: डॉ.विजय घोगरे

मराठा सेवा संघाचे काम तळागाळापर्यंत जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज: डॉ.विजय घोगरे

मराठा सेवा संघ ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मविप्रचे संचालक डॉ.प्रसाद सोनवणे तर नाशिक महानगर जिल्हाध्यक्षपदी जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता इंजि.स्वप्नील पाटील यांची निवड-प्रदेश कार्यकारिणीच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि.विजयकुमार घोगरे,कार्याध्यक्ष इंजि.नवनाथ घाडगे,प्रदेश उपाध्यक्ष इंजि.अरविंद गावंडे,सुरेंद्र पाटील,सुरेश पाटील,जिजाऊ सृष्टी प्रकल्प समन्वयक पुरुषोत्तम कडू,नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व वंदनेने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविकातून कार्यालयीन सचिव सोमनाथ लडके यांनी आढावा सादर केला.

मराठा सेवा संघ (Maratha Seva Sangh) ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मविप्रचे संचालक डॉ.प्रसाद सोनवणे तर नाशिक महानगर जिल्हाध्यक्षपदी जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता इंजि.स्वप्नील पाटील यांची निवड-प्रदेश कार्यकारिणीच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि.विजयकुमार घोगरे,कार्याध्यक्ष इंजि.नवनाथ घाडगे,प्रदेश उपाध्यक्ष इंजि.अरविंद गावंडे,सुरेंद्र पाटील,सुरेश पाटील,जिजाऊ सृष्टी प्रकल्प समन्वयक पुरुषोत्तम कडू,नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व वंदनेने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविकातून कार्यालयीन सचिव सोमनाथ लडके यांनी आढावा सादर केला. (Maratha Seva Sangh needs collective efforts to take its work to the grassroots level: Dr Vijay Ghogre )

यावेळी राज्यभरातून आलेल्या सर्व जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांनी आपल्या कामकाजाचा आढावा सादर केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ.विजय घोगरे यांनी मराठा सेवा संघाचे काम तळागाळापर्यंत जाण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रदेश कार्याध्यक्ष इंजि.नवनाथ घाडगे यांनी सोशल मीडियावर कोणीही एकमेकावर टीका करू नये असे सांगत केंद्रीय कार्यकारणीची दखल न घेणाऱ्यांवर कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी मराठा सेवा संघ ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ.प्रसाद सोनवणे तर नाशिक महानगर जिल्हाध्यक्षपदी जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता इंजि.स्वप्नील पाटील यांची निवड झाल्याबद्दल नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले.

नाशिक ग्रामिण जिल्हाध्यक्ष पदी डॉ.प्रसाद सोनवणे हे बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील रहिवासी आहेत.मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत विद्यमान संचालक आहेत.२००५ साली झालेल्या राज्यव्यापी जिजाऊ रथयात्रेत सहभागी झाले. तेव्हापासून ते मराठा सेवा संघाशी सक्रिय झाले आहेत.पत्नी डॉ.मेघना सोनवणे ह्या वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेल्या असून सध्या त्या जिजाऊ ब्रिगेडच्या नाशिक जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत.ताहाराबाद परिसरात त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल व सिद्धी इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नावाची शैक्षणिक संस्था आहे.त्याचबरोबर त्यांनी युवतींसाठी निवासी जिजाऊ डिफेन्स अकॅडमी सुरू केलेली आहे.अत्यंत हुशार व शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.सध्या त्यांच्याकडे वेगवेगळ्या १६ संघटना एकत्र करत इंग्लिश मीडियम स्कूल महासंघाचे ते राज्याचे अध्यक्ष आहेत.वेगवेगळ्या सामाजिक संघटनांवर ते कार्यरत असून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जिल्हा भर पाळेमुळे बघता डॉ.सोनवणे हे नाशिक जिल्ह्यातील ग्रामिण भागात मोठे कार्य उभे करतील अशी अशा मान्यवरांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.

नाशिक महानगर जिल्हाध्यक्षपदी जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी २ इंजि.स्वप्निल पाटील यांची निवड झाली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असणारे अभियंता पाटील हे सामाजिक कार्यात मदतीसाठी पुढे असतात.मुळगाव ब्राह्मणगाव तालुका सटाणा येथील मूळ रहिवासी आहेत.
प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण मराठा हायस्कूल नाशिक,डिप्लोमा गवर्नमेंट पॉलिटेक्निक सामनगाव कॉलेज नाशिक तर कर्मवीर बाबुराव ठाकरे इंजिनीअरिंग कॉलेज येथे झाले.त्यांचे वडील दिलीप अमृत पाटील सेवानिवृत्त बांधकाम विभागात अभ्यासू शाखा अभियंता म्हणून जिल्हा परिषद कार्यरत होते.शासकीय नोकरीची सुरुवात सन २०१३ साली एमपीएससी द्वारे सहाय्यक अभियंता श्रेणी २ पदावर जलसंपदा विभागात निवड झाली.गेल्या ९ वर्षापासून नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभाग नाशिक या विभागाअंतर्गत वाकी धरण येथे कार्यरत होते.वाकी धरण बाधित ५ गावांचे पुनर्वसन अनुशंगिक कामे केली.धरण पुरपाणी व्यापस्थपन केले. गेल्या ६ वर्षापासून रखडलेले गेटचे काम पूर्ण केले.तसेच दरसवाडी पोहच कालवा तालुका येवला कि.मी ०० ते ४२पर्यंतचे कामे पुरापाणी नियोजन केले.सन २०१९ साली ३०वर्षात पहिल्यांदा येवला तालुक्यातील कि.मी ४२ बाळापूर पर्यंत पुणेगाव धरणाचे पाणी पोहचविले.सद्यस्थितीत लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग नाशिक नाशिकसाठी पिण्याचे पाणी मिळावे असा महत्त्वाकांक्षी किकवी पेयजल प्रकल्प कार्यरत आहे.यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी