27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रPWD च्या माध्यमातून होणारी कामे देशासाठी समर्पित असतात : मंत्री रविंद्र चव्हाण

PWD च्या माध्यमातून होणारी कामे देशासाठी समर्पित असतात : मंत्री रविंद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून होणारी कामे देशासाठी समर्पित असतात. त्यामुळे देशसेवेच्या वृत्तीने काम करण्याची भावना जर प्रत्येकाच्या मनात असेल तर आपल्या हातून दर्जेदार कामे होतील. अधिकारी, कर्मचाऱ्यांना अशी काम करण्याची मोठी संधी असते. आणि असे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव झाला पाहिजे, आपल्या कामातून प्रत्यकजण वेगळा ठसा उमटवू शकतो, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

पीडब्ल्यूडी विभागातील 165 गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव आज मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. हा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमाला पीडब्ल्यूडीच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर- म्हैसकर, सचिव (रस्ते) स.शं. साळुंखे , सचिव (बांधकाम)सं. द. दशपुते, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता र. रा. हांडे, सहसचिव रोहिणी भालेकर, प्रादेशिक कार्यालय पुणेचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा 

मुंबईत वसतीगृहातील मुलीसोबतच्या दुर्देवी घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले

मुंबईत 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करुन हत्या; आरोपी सुरक्षारक्षकाने रेल्वेखाली केली आत्महत्या

जपानी नागरिक पैसे देऊन घेतायत हसण्याचे धडे; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण,…

मंत्री चव्हाण यावेळी म्हणाले, पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून राज्यातील जनतेला व्यापक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या कामात सर्व अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. या पुढे देखील असेच गुणपत्तापूर्ण काम सर्वांनीच करावे. सर्वाच्या सहकाऱ्याने आपल्या विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून राज्याला वेगळे वैभव प्राप्त करुन देण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली असून त्या दृष्टीने जोमाने आपण काम केले पाहिजे. या पुढे आपण वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा वेळेत होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणार असल्याचे देखील मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी