29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रMira Road  :  शबरी बारमध्ये 'डबल मर्डर'!

Mira Road  :  शबरी बारमध्ये ‘डबल मर्डर’!

लय भारी टीम

मीरा रोड :  मीरारोड  (Mira Road Double Murder) परिसरातील शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हत्या करुन या दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. नरेश पंडित (52) आणि हरेश शेट्टी (48) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही बारचे कर्मचारी होते. या बारच्या मालकाने गुरुवारी रात्री 10.30 वा. याबाबतची माहिती मीरारोड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता त्या दोघांचे मृतदेह टाकीत आढळून आले. तसेच या दोन्ही मृतदेहांच्या डोके आणि शरीरावर जखमा आढळल्या .

दरम्यान, मीरा रोड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दोघांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा शोध सध्या सुरु (Mira Road Double Murder) आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी