28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रजनतेने उधळला गुलाल आणि आमदार पत्नीने बजावले 'कर्तव्य'

जनतेने उधळला गुलाल आणि आमदार पत्नीने बजावले ‘कर्तव्य’

लय भारी न्यूज नेटवर्क : अजित जगताप

सातारा : दिवाळी म्हटलं की, सर्व घरातील साफसफाईची जबाबदारी गृहिणींना पार पाडावी लागते. पण जेव्हा विजयाच्या गुलालाने अंगण भरते. तेव्हा आमदारांच्याही पत्नीला साफसफाईचे ‘कर्तव्य’पार पाडावे लागते. हे सातारकरांनी अनुभवले.

सातारा ही छत्रपती शिवराय यांची राजधानी. या राजघराण्यातील भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातारा – जावळी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांना विजय झाला. तर दुसऱ्या बाजूला थोरले बंधू व खासदारकीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे यांच्या पराभवाची खंत होती. तरीही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. सातारा व जावळी तालुक्यातून आलेल्या शेकडो समर्थकांनी तसेच कार्यकर्त्यानी ‘सुरुची’ या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी भर पावसात गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. पावसातही गुलालाचे धुके पसरावे असे दृश्य दिसत होते.

सकाळी उठल्यावर आवारात पाहून आमदार पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांच्यातील सामाजिक कार्यकर्त्याने साफसफाईसाठी पुढाकार घेतला. यापूर्वी ‘कर्तव्य’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेकदा सातारा शहरातील स्वच्छतेसाठी वेदांतिकाराजे (वहिनीसाहेब) यांच्या हातात झाडू पहिला आहे. त्यामुळे आमदारांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या समर्थकांना सुद्धा खूपच नवल वाटले. गुलालाने माखलेले अंगण पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. दुसऱ्या हाताने त्या जनतेचे आभार मानत होत्या. सामान्य गृहिणींसारख्या घराची जबाबदारी पेलणाऱ्या वहिनीसाहेबांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या आमदारकीच्या निवडणुकीत प्रचार व नियोजनातही आपली चुणूक दाखवून दिली होती. मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी घरात नोकर -चाकर असतानाही स्वच्छता राखण्याचा संदेश देणाऱ्या आमदार पत्नीचे खरं म्हणजे कौतुक केले पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप महिला अध्यक्ष गीताताई लोखंडे, पंचायत समिती सदस्या सरिता इंदलकर, सरिता भिसे व अविनाश कदम यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी