29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयजितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोदी - फडणविसांच्या विरोधातही आंदोलन करावे...

जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोदी – फडणविसांच्या विरोधातही आंदोलन करावे : प्रकाश शेंडगे

टीम लय भारी

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 2 दिवसांपूर्वी ठाण्यात जाहीर सभेत ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच कारणामुळे त्यांच्या घरासमोर बुधवारी (दि. ५) भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाचा प्रकाश शेंडगे यांनी निषेध व्यक्त केला आहे. (activists-protesting-in-front-of-awhad’s-house-should-protest-against-modi)

ओबीसींचे मुख्य प्रश्न काय आहे? हे आजवर कोणी समजून घेतले नाही. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज ओबीसी समाज राजकिय अरक्षणापासून वंचित आहे, असे देखील शेंडगे म्हणाले.

ओबीसींवर फारसा विश्वास नाही : जितेंद्र आव्हाड

माझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांनी ट्वीट करून दिली माहिती

केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच इम्पिरील डेटा देण्यास देखील केंद्र सरकार तयार नाही. याच कारणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची वाताहत झाली आहे. भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करणार का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ओबीसी समाजाने एकत्र येत आपल्या मूलभूत हक्कासाठी लढा उभारला पाहिजेत असे प्रकाश शेंडगे म्हणलं.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको; माजी आमदार प्रकाश शेंडगेंची मागणी

Maharashtra Minister Jitendra Awhad’s remarks on OBCs sparks row

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी