29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून; अधिवेशन फक्त 15 दिवसाचे

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून; अधिवेशन फक्त 15 दिवसाचे

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन फक्त 15 दिवसाचं होणार आहे. आज विधिमंडळ सल्लागार समितीचे बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने अधिवेशन गाजले होते. यंदा अजित पवार यांनी बंड केल्याने हे अधिवेशन गाजणार का याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान विधिमंडळ कामकाज बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आदी उपस्थित होते. हे अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत असेल.

या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विधान भवनासाठी रवाना झाले. नंतर काही वेळात विधानसभा कामकाज सल्लागार समिती आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आहे. यंदा अजित पवार यांनी बंड केल्याने हे अधिवेशन गाजणार आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार विधिमंडळात येताना ५० खोके एकदम ओके अशा घोषणा विरोधक देत होते तेव्हा अजित पवारही त्यात सहभागी व्हायचे. आता त्यांच्या विरोधात यंदा घोषणाबाजी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नव्हे तर विधान भवनात आणि विधान भवन बाहेर विरोधक काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुध्दा वाचा:

क्रिकेटचा बादशहा महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

बुलढाणा अपघातात खळबळजनक खुलासा, बसचालक मद्यधुंद अवस्थेत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार साईबाबांचे दर्शन; शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त

राज्यात यंदा पावसाचे झालेले उशिराने आगमन, त्यामुळे अनेक ठिकाणच्या पेरण्या रखडल्या आहेत. सरकारी बियाणे बोगस निघाली. अशा शेतकऱ्यांच्या समस्या असतानाच, पाणी टंचाई, महागाईने कळस गाठला आहे. शिवाय राज्यात अनेक समस्या असल्याने हे अधिवेशन महिनाभर असावे असे सगळ्यांनाच वाटत होतो. पण यंदा अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी मंडळीना सोपे जाणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी