31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रCovid19 : मुस्लिम बांधवांचे कौतुकास्पद पाऊल, ‘कोरोना’साठी देऊ केली इमारत

Covid19 : मुस्लिम बांधवांचे कौतुकास्पद पाऊल, ‘कोरोना’साठी देऊ केली इमारत

टीम लय भारी

अहमदनगर : ‘कोरोना’ संसर्गाच्या ( Covid19 ) नावाखाली ‘मरकज’च्या घटनेचे खोटे व्हिडीओ पसरवून अनेक समाजकंटकांनी मुस्लीम समाजाला खलनायक ठरविले आहे. परंतु मुस्लिम हे देशभक्त आहेत. ते सामाजिक बांधिलकी जोपासतात. संकटकाळात मदतीलाही धावून येतात, हे नगरमधील मुस्लीम बांधवांनी दाखवून दिले आहे. या मुस्लीम बांधवांनी संपूर्ण इमारतच ‘कोरोना’ ( Covid19 ) आपत्तीसाठी देऊ केली आहे. तसे पत्रच त्यांनी सरकारला लिहिले आहे.

नगर – पाथर्डी रोड येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम ( अक्कलकुवा ) या संस्थेने हे देशभक्तीचे कार्य केले आहे. संस्थेने त्यांची बाराबाभळी ( ता. नगर ) येथील ‘जामिया मोहम्मदिया मदरसा’ ही इमारत देऊ केली आहे.

‘कोरोना’च्या ( Covid19 ) विलगीकरण कक्षासाठी इमारत वापरावी असे संस्थेच्या ट्रस्टने निर्णय घेतला आहे. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यांना पत्र दिले. ही इमारत सरकारने ताब्यात घेऊन तिथे विलगीकरण कक्ष स्थापन करावा अशी विनंतीही ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Covid19
मदरशाची इमारत कोरोनासाठी देण्याबाबत मुस्लीम समाजाने सरकारला पत्र दिले आहे

देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा ( Covid19 ) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळीच्या विश्‍वस्तांनी  एकमताने सदर मदरसाची इमारत प्रशासनाला विलगीकरण कक्षासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदरसामध्ये मुस्लिम समाजातील मुले शिक्षण घेत असतात. मुलांना सुटी असल्याने सदर इमारत मोकळी असून, प्रशासनाला ही इमारत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विलगीकरण कक्षात येणार्‍या नागरिकांसाठी जेवणाची सोय देखील करुन देण्याची तयारी मदरसाने दर्शवली आहे. ‘कोरोना’ ( Covid19 ) विरोधात चालू असलेल्या संघर्षात देशाबरोबर उभे राहून बाराबाबळीच्या मदरसाने या संघर्षाला पाठबळ दिले आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

बाराबाभळीचा हा मदरसा प्रशस्त असून तिथे मोठ्या संख्येने खोल्या आहेत. वीज व पाण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. याचा प्रशासनाला उपयोग होणार असल्याची भावना व्यवस्थापक सय्यद सादिक गफ्फार यांनी व्यक्त केली. ईस्लाम धर्माने माणुसकीची शिकवण दिली आहे. ही मानवजातीच्या आस्तित्वाची व संयमाची लढाई आहे. या लढाईत आम्हीही योगदान देऊ इच्छितो असे गफ्फार म्हणाले. यावेळी मदरसाचे विश्‍वस्त मतीन सय्यद, मन्सूर शेख, आसिर पठाण उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

MundeWithPawar : धनंजय मुंडेंच्या बीडला रोहित पवारांच्या बारामतीची मदत

Lockdown21 : समाजात तेढ निर्माण करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याला सोडणार नाही : पोलीस अधिक्षकांनी भरला दम

जगभरात ‘कोरोना’चे १३.५० लाख रूग्ण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी