31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown21 : समाजात तेढ निर्माण करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याला सोडणार...

Lockdown21 : समाजात तेढ निर्माण करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याला सोडणार नाही : पोलीस अधिक्षकांनी भरला दम

टीम लय भारी

जामखेड : समाजात तेढ निर्माण करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला प्रशासन सोडणार नाही. तसा कोणी प्रयत्नही करू नये. सर्वानी लॉकडाउनचे ( Lockdown21 ) नियम काटेकोरपणे पाळावेत. विघातक संदेश पसरवू नये. तेव्हाच आपण ‘कोरोना’ला लवकरात लवकर हद्दपार करू शकतो असा दम अहमदनगरचे नव नियुक्त पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी नगरच्या लोकांना भरला आहे.

पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी जामखेडला भेट दिली. त्यांनी जामखेडमधील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी जामखेड तहसिल कार्यालयात जातीय सलोख्याविषयी मुस्लिम समाजातील मौलाना व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, आरोग्य अधिकारी डॉ. युवराज खराडे, डॉ. सुनील बोराडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.

मुस्लीम समाजाच्या वतीने मौलाना खलील, अझर काझी, मुक्तार सय्यद, शामीर सय्यद, जाकीर सय्यद, नादीर शेख, इम्रान कुरेशी, वासिम कुरेशी, उमर कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी आठवडाभरापूर्वीच नगरचे पोलीस अधिक्षक म्हणून पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी धडाक्यात कामाला सुरूवात केली आहे. समाजात तेढ निर्माण करणार्‍या विघ्न संतोषी लोकांविरोधात ते गुन्हे दाखल करीत आहेत.

जामखेड पोलिस ठाण्यात मुस्लिम समाजाबद्दल अक्षेपार्ह मजकूर पाठवणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाला कसलीही माहिती न देता जमावबंदी ( Lockdown21 ) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चौदा जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने अखिलेशकुमार सिंह म्हणाले की, प्रत्येक समाजात काही थोडी लोकं विघ्नसंतोषी असतात. ते धर्माचे नीट अनुकरण करत नाहीत. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते. हे योग्य नाही. धर्मगुरूंनी व प्रमुख लोकांनी आपापल्या समाजातील लोकांना लॉकडाऊनची ( Lockdown21 ) आचारसंहिता काटेकोरपणे पालन करण्याविषयी प्रबोधन करावे.

‘करोना’ ही जागतिक आपत्ती आहे. समस्त मानव जात धोक्यात आलेली आहे. या आपत्तीतून सही सलामत बाहेर पडण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे घरातच थांबणे ( Lockdown21 ) हा होय. सरकारने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. पोलीस प्रशासनावर ताण येणार नाही असे कोणीही कृत्य करू नये. कोरोना हा संसर्गातून फैलावणारा रोग आहे.  अत्यावश्यक वस्तू खरेदी वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासन घेईल. आपण जर नियम काटेकोरपणे पाळले तर लवकर कोरोना मुक्त होऊ. अन्यथा लॉकडाऊन ( Lockdown21 ) कालावधी वाढला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले की, सध्या शहरातील सर्व मेडिकल व दवाखाने सुरू आहेत. जर कोणी बंद ठेवत असतील तर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्वजण लॉकडाऊनचे ( Lockdown21 ) काटेकोर पालन करतील असे आश्वासन मौलाना खलील यांनी पोलीस अधिक्षकांना दिले.

हे सुद्धा वाचा

Covid-2019 : भाजप आमदाराने रस्त्यावर येऊन मशाली पेटवल्या, घोळका केला, अन् सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्यही केले

PoliceAction : धार्मिक तेढ निर्माण करणारा मेसेज पाठविणाऱ्या औरंगाबादच्या डॉक्टरला अटक

PoliceAction : सोशल मीडियात मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणाऱ्या अंध भक्ताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

After COVID-19 outbreak at Tablighi Jamaat conference, fake news targeting Muslims abounds

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी