29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रMundeWithPawar : धनंजय मुंडेंच्या बीडला रोहित पवारांच्या बारामतीची मदत

MundeWithPawar : धनंजय मुंडेंच्या बीडला रोहित पवारांच्या बारामतीची मदत

टीम लय भारी

मुंबई : मुंडे – पवार ( MundeWithPawar ) नात्याचा एक वेगळा पैलू आज समोर आला आहे. धनंजय मुंडे यांच्या बीडसाठी रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोमार्फत मोफत सॅनिटायझर देण्यात आले आहे. त्यामुळे मुंडे – पवार यांच्या या नात्यातील नवा आयाम जनतेसमोर आला आहे.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात करोनाविरोधी लढाईला अधिक बळ देण्यासाठी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या वतीने बीड जिल्हा रूग्णालयाला 600 लिटर सॅनीटायझर पाठवण्यात आले आहे. रोहित पवारांनी केलेल्या या मदतीमुळे आता बीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीला ( MundeWithPawar ) बारामतीची पाॅवर धावून आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या बारामती अॅग्रो या कंपनीमार्फत बीड जिल्हा रूग्णालयाला नुकतेच सॅनिटायझर भेट दिले आहे. यामुळे दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे आरोग्य विभागाला सोपे जाणार आहे. यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी बारामतीची पाॅवर लावली आहे. बीड जिल्ह्यातील जनतेने करोनाविरोधातील लढाई खबरदारी घ्यावी, कुणीही घाबरून जाऊ नये. शासनाने व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांची काटेकार अंमलबजावणी करावी असे अवाहन बारामती अॅग्रोच्या वतीने करण्यात आले आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी मानले रोहितदादा यांचे आभार

जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या बारामती ऍग्रो मार्फत बीड जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला ६०० लिटर सॅनिटायझर मोफत देण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत आमदार रोहित पवारांकडे ( MundeWithPawar ) विनंती केली होती. आज बारामती ऍग्रोच्या वतीने बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे हे ६०० लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर धनंजय मुंडे ( MundeWithPawar ) यांनी आमदार रोहितदादा पवार व समस्त पवार कुटुंबियांचे आभार मानले आहेत.

MundeWithPawar

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सध्या सॅनिटायझर्सचा तुटवडा आहे. याचा विचार करून बारामती ऍग्रो समूह पुढे येऊन सॅनिटायझर निर्मिती करत आहेत.

याबाबत माहिती मिळताच बीड जिल्ह्यातील सॅनिटायझरची निकड लक्षात घेता मुंडेंनी बारामती ऍग्रो कडून बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सॅनिटायझर देण्याबाबत आ. रोहित पवारांकडे विनंती केली होती. या विनंतीला आमदार पवारांनी ( MundeWithPawar ) लागलीच सकारात्मक प्रतिसाद दिला.

मागील वर्षीच्या भीषण दुष्काळातही आमदार रोहित पवारांनी ( MundeWithPawar ) बारामती ऍग्रोच्या वतीने जिल्ह्यात टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा केला होता. दुष्काळ किंवा विविध संकट काळात बारामती नेहमीच बीड जिल्ह्याच्या मदतीला धावून आलेली आहे.

खासदार शरद पवार, अजितदादा पवार यांच्यापाठोपाठ आता पुढच्या पिढीतील आमदार रोहित पवार यांनीही ही परंपरा कायम राखली असून त्यांचे बीड जिल्हा वासीयांच्या वतीने आभार मानतो, अशा शब्दांत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे ( MundeWithPawar ) यांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.

कर्जत – जामखेडमध्ये रोहित पवार घेत आहेत जनतेची काळजी

कर्जत – जामखेड मतदारसंघातील जनतेत करोना विषयीची जनजागृती व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड व कर्जत शहरातील प्रमुख रस्त्यांवर पेंटींग करून प्रबोधनात्मक स्लोगन व चित्रे रेखाटले जात आहेत. रस्त्यावरील स्लोगन आता लक्षवेधी ठरत आहेत. रस्त्यांवर रेखाटलेले चित्रे पाहून आपसुकच नागरिकांचे पाय घराकडे वळू लागले आहेत.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून सोडियम हायपोक्लाराईड या रसायनाची फवारणी गावोगावी केली जात आहे. मतदारसंघात करोनाचा अधिक उद्रेक होऊ नये यासाठी पवार घरातून मतदारसंघावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. ते मतदारसंघातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमित संवाद साधत आहेत. जनतेच्या अडी अडचणी ऐकुन घेत त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकार्यांशी संवाद करून प्रश्न मार्गी लावत आहेत.

पवार यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील सर्व गावे, वाड्या ,वस्त्या व मोठ्या शहरांमध्ये दोनदा जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे. करोना महामारीचे गांभीर्य जनतेने घ्यावे यासाठी प्रशासन व रोहित पवार यांची यंत्रणा विविध उपाययोजना राबवत आहे.

आमदार पवार यांनी करोनाच्या जनजागृतीसाठी थेट रस्त्यांचा केलेला वापर हा राज्यातील पहिला प्रयोग ठरला आहे. रस्त्यावरून चालणार्या नागरिकांचे लक्ष थेट स्लोगन व चित्रांवर जात असल्याचे हा प्रयोग परिणामकारक ठरू लागला आहे. या प्रयोगाचे जनतेतून कौतूक होत आहे.

हे सुद्धा वाचा

Dr. Nitin Raut : डॉ. नितीन राऊत धावले मोदी सरकारच्या मदतीला

Coronavirus : देवेंद्र फडणवीस यांना रेशनिंगचे लाभार्थी व्हायचे आहे का ? : काँग्रेसने फटकारले

देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४५५३

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी