30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रअंबानीला मदत करण्यासाठी भाजपकडूनच स्फोटक प्रकरणाचा बनाव, नाना पटोले यांचा आरोप

अंबानीला मदत करण्यासाठी भाजपकडूनच स्फोटक प्रकरणाचा बनाव, नाना पटोले यांचा आरोप

टीम लय भारी

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हेलिपॅडला परवानगी मिळावी, तसेच त्यांच्या कंपनींच्या घसरत असलेल्या शेअर्सना उभारी मिळावी म्हणून भाजपनेच ‘स्फोटकां’चे बनावट प्रकरण शिजवले आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole scathing to BJP and Devendra Fadnavis ) यांनी केला आहे.

अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. हे हेलिपॅड वापरात नाही. हेलिपॅड वापरण्यासाठी त्यांना परवानगी मिळत नाही. ‘जिवास धोका आहे’ असे दाखविण्यासाठी स्फोटकांनी भरलेली गाडीचे कुभांड रचण्यात आले. त्यामागे भाजप आहे, असे पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ( A car full of explosives was set up to show that ‘life is in danger’. The BJP is behind it, Nana Patole told reporters).

हे सुद्धा वाचा

सचिन वाझे यांची उचलबांगडी होणार, गृहमंत्र्यांचे विधान परिषदेत निवेदन

आदिवासी विकास मंत्र्यांनी फसवले! एकाच वेळी तब्बल 45 पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

सचिन वाझे यांनीच केली मनसुख हिरेन यांची हत्या! देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस निखालस खोटारडे, नाना पटोले संतापले

Slogans raised in Maha Assembly demanding arrest of police officer involved in Antilla bomb scare probe

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या विविध कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत आहेत. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातून अंबानींप्रती जनमाणसांमध्ये सहानुभूती मिळावी. दुसऱ्या बाजूला सुरक्षेच्या कारणास्तव हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भाजपानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवले असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले ( Nana Patole ) म्हणाले की, अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तीक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी ? हा प्रश्न आहे.

सन २००९ मध्ये अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता, याची आठवणही पटोले ( Nana Patole ) यांनी करून दिली. राज्यात व देशातील महत्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपानेच हे कुभांड रचले. अधिवेशनातील महत्वाचा वेळही त्यामुळे वाया घालवला, असेही पटोले ( Nana Patole ) म्हणाले.

हे सुद्धा पाहा

Appeal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी