30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात राष्ट्रीय तपास यंत्रेनेचं छापेमारीचे सत्र सुरूच, एकाला अटक

राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रेनेचं छापेमारीचे सत्र सुरूच, एकाला अटक

राज्यात सध्या राष्ट्रीय तपास यंत्रेनेचं छापेमारीचे सत्र सुरूचं आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये आतापर्यंत 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान एनआयएने नागपाडा मधील एका रहिवाशा विरोधात 28 जूनला गुन्हा दाखल केला होता. यामुळे आता ही छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएने पाच ठिकाणी छापेमारी सुरु असून त्यामध्ये मुंबई आणि भिवंडी प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

आयएसआयएसच्या संपर्कात असलेल्या आणखी काही जणांवर छापेमारी करण्यात आली. नगपाडा येथून अटक करण्यात आलेला हा व्यक्ती काही दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती. त्याननुसार पुण्यात एनआयए आणि आयबीच्या पथकाने छापे टाकले. त्यानुसार एकाला पुण्यातील कोंढवा येथून वजीर कस्केड सोसायटीमध्ये कारवाई करत जुबेर शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे.

हे सुध्दा वाचा:

बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकावर डागले फोटोअस्त्र

येवा कोकण आपलास आसा; कोकणासाठी आणखी 52 गणपती स्पेशल ट्रेन!

मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे नऊ मंत्री; शिंदे गटात अस्वस्थता

पुण्यात एनआयए आणि आयबीची छापेमारी सुरु आहे. एनआयए आणि आयबीच्या पथकाकडून कोंढव्यात छापे टाकण्यात आले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये एनआयए आणि आयबी पथकाकडून छापेमारी करण्यात आली. मुंबई सारखा मोठ्या शहरात अनेक वेळा धमकीचा फोन, मेल आल्यामुळे यंत्रणा अजून सतर्क झाली आहे. त्यामुळे वारंवार अशा कारवाया करण्यात येत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी