29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रहरीनामच्या गजरात निवृत्तीनाथांच्या पालखीचे सोलापूरकडे मार्गक्रमण, मुक्ताबाईंची पालखी भूम मुक्कामी

हरीनामच्या गजरात निवृत्तीनाथांच्या पालखीचे सोलापूरकडे मार्गक्रमण, मुक्ताबाईंची पालखी भूम मुक्कामी

पंढरीत माझ्या सखा पांडुरंग
पंढरीत माझ्या सखा पांडुरंग
विटेवर आहे उभा रखुमाई संग
विटेवर आहे उभा रखुमाई संग………..
ओठावर विठुरायचे नाम, मनात विठुरायाला भेटायची ओढ, टाळ मृदुंगाच्या तालात माऊलींचा गजर करत वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आणि संत मुक्ताबाईंच्या पालखीचा आज 20 वा दिवस. भक्तिरसात डुंबून निघालेले वारकरी हळूहळू पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल नगर जिल्ह्यातील कोरेगाव येथे मुक्कामाला होती. कालच्या कोरेगावतील मुक्कामानंतर आज पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहरात मुक्कामी असणार आहे.

हे सुध्दा वाचा:

योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी राहा; योग दिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा गैरव्यवहार; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

अभियंत्याला हसू आले, अन आमदार गीता जैन यांनी त्याचे गाल लाल केले….

राज्यभरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. लाखों भाविक दिंड्यामध्ये सहभागी होत आहेत. या पायी प्रवासाला आज वीस दिवस पूर्ण होतील, तर अनेक दिंड्यानी पंधराहुन अधिक दिवसांचा प्रवास केला आहे. पण वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. मुक्ताईनगरमधून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल वाकवडला मुक्कामाला होती. आज पालखीने उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम कडे मार्गक्रमण केले आहे. भूम गावातील चौंडेश्वरी देवी व्यापारी मंडळाकडून वारकऱ्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून आज पालखी याच शहरातील रवींद्र हायस्कूल येथे रात्री मुक्काम करणार आहे. निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर आहे आज सायंकाळपर्यंत पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून आज पालखीचा मुक्काम सोलापुरातील रावगावला असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी