28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र३७५० मतदारांनी नोंदवले पोस्टल बॅलेटने मतदान

३७५० मतदारांनी नोंदवले पोस्टल बॅलेटने मतदान

८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदानाची सुरुवात करण्यात आली असून, संपूर्ण जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येते आहे. ३५ हजार मतदारांना त्याचा फायदा होणार असून, त्याअंतर्गत दोनच दिवसांत ३७५० मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क बजावला. येत्या आठवड्यात उर्वरित मतदान पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सरसावली असून, त्याद्वारे जास्तीत जास्त मतदान कसे होईल, याकडे यंत्रणेचे लक्ष लागले आहे.सरकारी कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट मतदानाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदानाची सुरुवात करण्यात आली असून, संपूर्ण जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येते आहे. ३५ हजार मतदारांना त्याचा फायदा होणार असून, त्याअंतर्गत दोनच दिवसांत ३७५० मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क बजावला. येत्या आठवड्यात उर्वरित मतदान पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सरसावली असून, त्याद्वारे जास्तीत जास्त मतदान कसे होईल, याकडे यंत्रणेचे लक्ष लागले आहे.सरकारी कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट (postal ballot) मतदानाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.(3,750 voters cast their votes by postal ballot)

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि. २० मे) मतदान घेण्यात येणार आहे. प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत व राज्य निवडणूक आयोग आग्रही आहे. कुणीही मतदार कोणत्याही कारणाने मतदानापासून वंचित राहू नये याची काळजी आयोगाकडून व जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसह ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना घरबसल्या पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय सरकारी कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट (postal ballot) मतदानाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

तालुका झालेले पोस्टल मतदान
मालेगाव मध्य ६९

मालेगाव बाह्य ९६
बागलाण १६७

नांदगाव १२३
कळवण सुरगाणा ११३

चांदवड देवळा १०२
येवला ११८

निफाड ११४
दिंडोरी २०५

सिन्नर ४२५
नाशिक पूर्व १६३

नाशिक मध्य ८४
नाशिक पश्चिम ०

देवळाली ९५
इगतपुरी त्रंबक १०४

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी