26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक गांधीनगर प्रेसच्या वसाहतीच्या उद्यान परिसरात मद्यपींचा वावर

नाशिक गांधीनगर प्रेसच्या वसाहतीच्या उद्यान परिसरात मद्यपींचा वावर

गांधीनगर प्रेसच्या वसाहतीत सुमारे सव्वा तीन कोटी रुपये खर्च करून अटलबिहारी वाजपेयी नवे उद्यान (park area) साकारले आहे. उद्यान आणि परिसरात रात्री मद्यपींचा वावर वाढला आहे. रोज या ठिकाणी बाहेरील युवक ठिय्या मांडून मद्यप्राशन करतात अशी नागरिकांची तक्रार आहे. या तळीरामांना स्थानिक रहिवाशांनी हटकल्यास त्यांना दमबाजी केली जाते. त्यामुळे भीतीपोटी स्थानिक नागरिक तक्रार करण्यास धजावत नसल्याने या गुंडांचे चांगलेच फावत आहे. पोलिसांनी तळीरामांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(Drunks roam the park area of Nashik Gandhinagar Press colony )

नगरसेवकांनी पुढाकार घेत आमदार निधीतून हे उद्यान साकारले. चांगल्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या उद्यानाचा आणि इमारतीचा फायदा मद्यपी घेत आहेत.  या ठिकाणी जिमचे साहित्य व वॉकिंगची व्यवस्था आहे. त्यामुळे सकाळी जेष्ठ नागरिक आणि महिलांची गर्दी होत असते. मात्र या ठिकाणी मद्यपी दारूच्या बाटल्या,  कागदी व प्लास्टिक ग्लास तसेच सोडून जातात. त्याने उद्यान (park area) अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतोच, परंतु  फोडलेल्या काचाच्या बाटल्यांमुळे दुखापतही होते. हा शांत आणि कमी रहदारीचा परिसर असल्याने बाहेरील  गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी येत असतात.  प्रेमी युगुलही येथे येतात. प्रियकरासोबत झालेल्या भांडणानंतर येथील दुमजली इमारतीवरून  युवतीने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ते दोघेही बाहेरून आलेले होते. उद्यान परिसरात प्रेमी युगल सर्रासपणे दिसून येतात. 

आता त्यात मद्यपींची भर पडली आहे. उद्यानाच्या तारा तोडून मद्यपी आत प्रवेश करतात. दारूची मैफल रंगली की अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि आरडाओरड करून परिसरातील शांततेला गालबोट लावतात असे नागरिकांनी ना सांगितले. त्यामुळे स्थानिक ज्येष्ठ नागरिक महिला, मुलींना परिसरात फिरणे अवघड झाले आहे. पोलिसांनी रात्री गस्त वाढवून तळीरामांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी