27 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजळगावमध्ये उन्हाचा कहर; मुक्या जीवांना त्रास, 100 मेंढ्या दगावल्या; आमदाराने घेतली धाव

जळगावमध्ये उन्हाचा कहर; मुक्या जीवांना त्रास, 100 मेंढ्या दगावल्या; आमदाराने घेतली धाव

यंदाच्या हंगामातील मान्सनपूर्व उन्हाळ्यामुळे अंगाची लाही-लाही होत असून देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थानमध्ये झाली आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये 49 अंश सेल्सियपर्यंत तापमान पोहोचलं आहे.तर, महाराष्ट्रातील विदर्भ आणि खान्देशात उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. जळगावमध्ये काल उन्हाच्या तडाख्यात वाहतूक करणाऱ्या ट्रकलाच एका भीषण आग लागल्याचे दिसून आले होते. आता, उन्हाच्या कडक प्रहारामुळे मुक्या पशुधनास जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला असून 47 अंशांवर तापमान पोहोचले आहे.

यंदाच्या हंगामातील मान्सनपूर्व उन्हाळ्यामुळे अंगाची लाही-लाही होत असून देशातील सर्वाधिक तापमानाची (Temperature) नोंद राजस्थानमध्ये झाली आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये 49 अंश सेल्सियपर्यंत तापमान पोहोचलं आहे.तर, महाराष्ट्रातील विदर्भ आणि खान्देशात उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. जळगावमध्ये काल उन्हाच्या तडाख्यात वाहतूक करणाऱ्या ट्रकलाच एका भीषण आग लागल्याचे दिसून आले होते. आता, उन्हाच्या कडक प्रहारामुळे मुक्या पशुधनास जीव गमवावा (sheep killed) लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला असून 47 अंशांवर तापमान (Temperature) पोहोचले आहे.(Heat wave in Jalgaon; 100 sheep killed; The MLA rushed to)

महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सध्या विदर्भ व खान्देशात पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा (Temperature) पारा 47 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांना, शेतातील पिकांनाच बसतो असे नाही. तर, मुक्या जीवांना देखील कडक उन्हाळ्याचा त्रास होत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताई नगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू (sheep killed) झाल्याची माहिती आहे. या खळबळजनक घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा असून उन्हामुळे नागरिकही घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

आमदार पाटील यांनी दिली भेट

जळगावीमधील मेंढ्या दगावल्याच्या घटनेनंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. तसेच, स्थानिक पशू चिकित्सक यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असून उष्मा घातामुळेच मेंढ्या मरण (sheep killed) पावल्याचे निदान त्यांच्या अहवालातून समोर आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी