30 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानाला गेले.सध्या इथं कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्याचा मतदानावर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळंच कांद्यासंबंधीच्या एका घटनेनं इथं मतदान केंद्रावर लक्ष वेधून घेतलं. काही शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गळ्यात कांदे आणि टोमॅटोच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावला. पण त्यांना पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून मतदान करण्यास सांगितलं. "ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी," अशा घोषणाही या तरुणांनी यावेळी दिल्या. या प्रकारामुळं मोठा जनसमुदाय गोळा झाला होता पण पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणलं.

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानाला गेले.सध्या इथं कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्याचा मतदानावर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळंच कांद्यासंबंधीच्या एका घटनेनं इथं मतदान केंद्रावर लक्ष वेधून घेतलं. काही शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गळ्यात कांदे आणि टोमॅटोच्या माळा (tomatoes, onion garlands around their necks) घालून मतदानाचा (votes) हक्क बजावला. पण त्यांना पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून मतदान करण्यास सांगितलं. “ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी,” अशा घोषणाही या तरुणांनी यावेळी दिल्या. या प्रकारामुळं मोठा जनसमुदाय गोळा झाला होता पण पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणलं.(In Nashik, tomatoes, onion garlands around their necks cast their votes)

कांद्याच्या माळा घालून मतदान
नाशिकमध्ये सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे, तो कांद्याचा भाव. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरत आहेत. यावर शेतकरी नाराज आहे. केंद्र सकारने कांदा निर्यात बंदी केल्याने दर कोसळत असल्याचा आरोप शेतकरी आणि शेतकरी संघटनेंकडून होत आहे. महायुती भाजपला कांद्याचा दर रडवणार असल्याचे दिसते. नाशिकमधील लासलगावमध्ये कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधील सभेत तरुण शेतकऱ्यांनी कांद्यावरून बोला, अशी मागणी केली होती. तशी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी सभेत गोंधळगों उडाला होता. आता तर शेतकऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी कांद्याच्या माळा घालून गेले. नाशिकमध्ये मतदानावेळी चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांनी मतदानाला गळ्यात कांद्याच्या माळा घालून गेले. संघटीतपणे कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्रावर आल्याने त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी मतदार शेतकरी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी कांद्याच्या माळा मतदान केंद्रात घेऊन जाण्यात मज्जाव केला. कारवाईचा इशारा दिला. यावरून मतदान केंद्राबाहेर काहीसा गोंधळगों झाला. यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा काढून केंद्रात गेले. तसेच सटाण्यातील मतदान केंद्रावर माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण देखील कांद्याच्या माळा घालून आले होते. त्यांनी तिथे मतदान केंद्रावर
मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, या प्रकारावर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, “मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेल्यानं मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाहीत. त्यामुळं मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका” कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढं सत्याग्रह करा, असं आवाहनही यावेळी भुजबळ यांनी संबंधित शेतकऱ्यांना केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी