33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य व वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत.मे महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तापमानामुळे मतदारांना देखील त्रास होण्याची शक्यता गृहीत धरून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य व वैद्यकीय सुविधा (medical services) सज्ज ठेवण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत.मे महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तापमानामुळे मतदारांना देखील त्रास होण्याची शक्यता गृहीत धरून वैद्यकीय सुविधा (medical services) उपलब्ध करून देण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.(It is the responsibility of the municipal corporation to provide medical services at the polling booths)

महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, प्रायव्हेट मेडिकल असोसिएशन, फॅमिली प्रॅक्टिशनर असोसिएशन, सातपूर-अंबड डॉक्टर असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन या संघटनांची बैठक घेतली. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधांची गरज भासणार असल्याने सेवा देण्याचे आवाहन डॉ. चव्हाण यांनी कले. २०५ शाळांमध्ये दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रुग्णवाहिका व राखीव खाटा सज्ज ठेवण्याच्या सूचनांचा समावेश आहे.

त्या अनुषंगाने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने औद्योगिक संघटना व अन्य सामाजिक संघटनांकडून व्हीलचेअर, डॉक्टर, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी २० मे मतदान होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने वैद्यकीय आरोग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे.

 

सामाजिक दायित्वाच्या निधीतून मोठ्या रुग्णालयांनी वैद्यकीय सुविधा देण्याचे देखील आवाहन केले. दरम्यान, सद्यःस्थितीमध्ये ६४ व खासगी रुग्णालयांकडून २५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शहरात २०५ ठिकाणी एक हजार २६७ मतदान केंद्र आहे. त्या ठिकाणी वैयक्तिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी