28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअध्यात्मिक उन्नतीसाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोग शिकणे अती आवश्यक - ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी

अध्यात्मिक उन्नतीसाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोग शिकणे अती आवश्यक – ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी

शारीरिक व आध्यात्मिक हे दोन विषय सोबतच असतात मनुष्याचे जीवन या दोन विषयांनीच बनलेले आहे. भौतिकदृष्ट्या आपण एकमेकांना ओळखतो परंतु अध्यात्मिक दृष्ट्या व्यक्ती स्वतःला हा सुद्धा ओळखू शकत नाही ओळखत नाही आपण कोण आहे आपल्यामधील क्षमता काय यापासून मनुष्य अंनभिज्ञ आहे. आज धकाधकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी सुद्धा वेळ नाही. मात्र आपण सर्वांना एक आवाहन आहे की वेळात वेळ काढून आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोग शिकणे अती आवश्यक आहे. तेव्हाच शारीरिक व अध्यात्मिक विषयांचा समतोल साधला जाईल. असे प्रतिपादन नाशिक जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी < Brahma Kumari Vasanti Didiji>
यांनी केले.(Learning Raja Yoga of Brahma Kumari Sansthan is very important for spiritual advancement : Brahma Kumari Vasanti Didiji)

डॉ. उज्वल कापडणीस यांच्या प्रयत्नातून एक वर्षा पूर्वी गंगापूर रोड येथील शिवसत्या ग्राउंड व समर्थ जॉगिंग ट्रॅक येथे म्युझिकल योगाची सुरुवात करण्यात आली. ब्रह्माकुमारी संस्थेच्या गितांवर आधारित या योगा प्रकाराला अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या स्थरातील 400 पेक्षा अधिक लोकांनी या योगा प्रकाराला अंगिकारून आपले शरिरस्वास्थ्य साधले. ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य डॉ. उज्वल कापडणीस यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिनांक 29 मार्च रोजी गंगापूर रोड येथील प्रसाद मंगल कार्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्माकुमारी वासंती दिदिजी बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी गंगापूर रोड ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी मनीषा दीदी, नगरसेविका स्वाती भामरे श्री रोग तज्ञ डॉक्टर नलिनी बागुल, म्युझिकल युगाचे प्रणेते डॉक्टर उज्वल कापडणीस व डॉक्टर मनीषा कापडणीस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रमुख अतिथी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी व ब्रह्माकुमारी मनीषा दीदी यांच्या स्वागतासाठी भव्य फुलांची रांगोळी काढण्यात आली होती शंखनाद व औक्षण करून दीदींचे भव्य स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत दीदींना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले. या नयनरम्य सोहळ्याची ह्याची देही याची डोळा सुंदर दृश्य बघून अनेकांचे डोळे पाणावले. कुमारी सहर्षा हिच्या नृत्याने दीदींच्या स्वागतात अधिकच भर घातली.

ब्रह्माकुमारी मनीषा दीदी यांनी सांगितले की स्प्रिचूअली हेल्दी झाल्यास आपण सर्व आजारांपासून मुक्त होऊ शकतो. आपल्या विचारांच्या आधारे आपले शारीरिक आरोग्य हे प्रभावित होत असते. ब्रह्माकुमारी संस्थेत शिकवण्यात येणाऱ्या साप्ताहिक राजयोगातून आपण नक्कीच विचारांना दिशा देऊ शकतो व आपले जीवन उज्वल बनू शकते.
नगरसेविका स्वाती भामरे यांनी सांगितले की ब्रह्माकुमारी संस्थेचा राज योग काय असतो हे आम्हाला या म्युझिकल योगा द्वारेच कळाले ब्रह्माकुमारी मनीषा दीदींनी राज योगाचे महत्त्व विशद करून सांगितले त्यामुळे आम्ही या संस्थेशी अधिकच जुळले गेलो.

डॉक्टर नलिनी बागुल यांनी सांगितले की डॉक्टर मनीषा कापडणीस यांनी म्युझिकल योगा सोबतच राजयोगा अभ्यास करविला यातून अनेक महिलांमध्ये आज आत्मविश्वास वाढला आहे व अनेकांचे शरीर स्वास्थ्य सुदृढ झाले असून महिलांना या योगा प्रकारामुळे खूप फायदा झालेला आहे.डॉक्टर उज्वल कापडणीस यांनी सांगितले की 2009 सालापूर्वी मी वेगळ्या स्वभाव गुणधर्माचा होतो मात्र ब्रह्माकुमारी संस्थेच्या सानिध्यात आल्यामुळे माझ्यात अमुलाग्र बदल झाला व आज माझे जीवन खूप उज्वल झालेले आहे. पूर्वीचा व आजच्या जीवनात खूप बदल झालेला असून हा बदल ब्रह्माकुमारी संस्थेमुळेच झालेला आहे.डॉक्टर मनीषा कापडणीस यांनी सांगितले की म्युझिकल योगा हे एक माध्यम आहे मात्र ब्रह्माकुमारी संस्थेचा राज योगा मेडिटेशन करणे हे आपले साध्य आहे. शरीर स्वास्थ्यासोबतच ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोगा मेडिटेशन करणे व ब्रह्माकुमारी संस्थेत येऊन अध्यात्म जाणून घेणे हे खूप आवश्यक आहे.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन रुपाली शिरुडे यांनी केले. कार्यक्रमात नाशिक मध्ये वेगवेगळ्या पाच ठिकाणी चालवण्यात येणाऱ्या या म्युझिकल योगाचे योग शिक्षकांना सुद्धा याप्रसंगी सत्कारित करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने योगा साधक उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी