29 C
Mumbai
Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवार

कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवार

नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न देशपातळीवर चांगलाच चर्चेत आला. कांद्याचे दर, कांद्यावरील निर्यातबंदी यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. जिल्ह्यात झालेल्या विविध सभांमधून देखील विरोधकांनी कांदा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महायुतीच्या उमेदवारांसाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेत देखील एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी 'कांद्यावर बोला' असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली होती.

नाशिक जिल्ह्यातील कांदा ( Onion issue) प्रश्न देशपातळीवर चांगलाच चर्चेत आला. कांद्याचे दर, कांद्यावरील निर्यातबंदी यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. जिल्ह्यात झालेल्या विविध सभांमधून देखील विरोधकांनी कांदा ( Onion issue) प्रश्नावर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महायुतीच्या उमेदवारांसाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेत देखील एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी ‘कांद्यावर बोला’ असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली होती.(Onion issue to be resolved by PM Modi; Bharati Pawar)

मी निवडून आल्यास कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार : डॉ. भारती पवार
यामुळे दिंडोरी लोकसभेची निवडणूक कांदा प्रश्नाभोवती केंद्रित झाल्याचे दिसून आले . डॉ. भारती पवार म्हणाल्या की, ‘मी निवडून आल्यास कांदा प्रश्न हक्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोडवून घेईल’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कांदा प्रश्नी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पिंपळगाव बसवंत येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना एका तरुण शेतकऱ्याने जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांदा प्रश्नी वक्तव्य केले. ते म्हणाले की, कांदा स्टॉक करण्याचे काम आम्ही सुरू केले. 60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही खरेदी केला. आता 5 लाख मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत. 35 टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढला आहे. निर्यातीसाठी आम्ही अनुदान देखील दिले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी