28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररेल्वेची ४८७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

रेल्वेची ४८७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रेल्वेला गर्दी वाढल्याने भुसावळ विभागाकडून १०६ जादा रेल्वे चालविल्या जात आहेत. दरम्यान नाशिकरोड, भुसावळ, मनमाड या रेल्वेस्थानकावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या ४८७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरफुलसिंह यादव यांनी दिली. उन्हाळ्याच्या सुटीमुळे प्रवाशांची रेल्वेला मोठी गर्दी वाढल्याने अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे सुरक्षा बल व वाणिज्य विभागाकडून संयुक्तरीत्या नाशिकरोड, मनमाड, भुसावळ रेल्वेस्थानकावर फुकट्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रेल्वेला(Railways) गर्दी वाढल्याने भुसावळ विभागाकडून १०६ जादा रेल्वे चालविल्या जात आहेत. दरम्यान नाशिकरोड, भुसावळ, मनमाड या रेल्वेस्थानकावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या ४८७ फुकट्या प्रवाशांवर(487 stranded passengers) कारवाई (action) करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरफुलसिंह यादव यांनी दिली. उन्हाळ्याच्या सुटीमुळे प्रवाशांची रेल्वेला मोठी गर्दी वाढल्याने अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे सुरक्षा बल व वाणिज्य विभागाकडून संयुक्तरीत्या नाशिकरोड, मनमाड, भुसावळ रेल्वेस्थानकावर फुकट्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली.(Railways takes action against 487 stranded passengers)

यामध्ये महिनाभरात ४८७ फुकट्या प्रवाशांवर (487 stranded passengers) कारवाई करण्यात आली आहे. तसेच, रेल्वेस्थानक परिसरात दुर्गंधी व घाण करणाऱ्या ३२ व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ५९ दलालांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांचा सुखकर प्रवास व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

जानेवारीपासून आतापर्यंत रेल्वेमध्ये अनधिकृत विविध वस्तू विक्री करणाऱ्या ३७०३ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे ५७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरफुलसिंह यादव यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी