27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एसआरपीएफच्या पाच तुकड्यांचा आढावा;पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एसआरपीएफच्या पाच तुकड्यांचा आढावा;पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये येत्या बुधवारी (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेची चोख तयारी करण्यात आली आहे.नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एसआरपीएफच्या पाच तुकड्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आढावा घेतला.  या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नुकताच अधीक्षक कार्यालयात बैठकीत घेतला. राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्या ग्रामीण मुख्यालयात दाखल झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये येत्या बुधवारी (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेची चोख तयारी करण्यात आली आहे.नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेसाठी एसआरपीएफच्या पाच तुकड्या (five SRPF units) पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी आढावा घेतला.  या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नुकताच अधीक्षक कार्यालयात बैठकीत घेतला. राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्या (five SRPF units) ग्रामीण मुख्यालयात दाखल झाल्या आहेत.(Review of five SRPF units for Narendra Modi’s rally; Director General of Police Rashmi Shukla )

नाशिकमध्ये मोदी (Narendra Modi) यांची ही एकमेव सभा होणार आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समिती हे सभास्थळ निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेल्या या सभास्थळाभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयासह ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखा अलर्ट मोडवर आहेत. राज्य गुप्तवार्ता, विशेष शाखेच्या पथकांकडूनही माहिती घेतली जात आहे. शहर, ग्रामिण पोलिसांच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकांसह अन्य जिल्ह्यांमधूनही बीडीडीएसची पथके मागविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

शुक्ला यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या बैठकीला विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अनिकेत भारती यांसह विशेष व गुन्हे शाखांचे अधिकारी, विशेष सुरक्षारक्षक (एसपीजी) दलाचे प्रमुख अधिकारीसुद्धा उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचे संभाव्य दौरे नाशिकमध्ये नियाेजित आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी