29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडिला पाठिंबा

संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडिला पाठिंबा

शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांचे जुने नाते सबंध असून प्रबोधनकारांचे वैचारिक ऋुणांनुबंध आहेत. देशातील वाॅशिंगमशीन व हिटलरला हद्दपार करण्यासाठी नाशिक लोकसभेसह राज्यभरात आम्ही महाविकास आघाडिला पाठिंबा देत असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडचे महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी (दि.२२) पत्रकार परिषद घेत त्यांनी भुमिका स्पष्ट केली. यावेळी ठाकरे गट जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, काॅग्रेस शहराध्यक्ष अॅड.आकाश छाजेड, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष शरद लभडे, जिल्हा सचिव नितीन रोटे पाटिल,

शिवसेना व संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांचे जुने नाते सबंध असून प्रबोधनकारांचे वैचारिक ऋुणांनुबंध आहेत. देशातील वाॅशिंगमशीन व हिटलरला हद्दपार करण्यासाठी नाशिक लोकसभेसह राज्यभरात आम्ही महाविकास आघाडिला पाठिंबा देत असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडचे महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी (दि.२२) पत्रकार परिषद घेत त्यांनी भुमिका स्पष्ट केली. यावेळी ठाकरे गट जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, काॅग्रेस शहराध्यक्ष अॅड.आकाश छाजेड, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष शरद लभडे, जिल्हा सचिव नितीन रोटे पाटिल,(Sambhaji Brigade supports Maha Vikas Aghadi)

उपजिल्हाप्रमुख विक्रम गायधनी आदी उपस्थित होते. मविआच्या उमेदवारासाठी चौक व आठवडे बाजार सभा आम्ही घेणार असून मतदारसंघात प्रचार करणार असल्याचे सांगितले. बडगुजर यांनी नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. कोंडाजी मामा यांनी भाजपवर टीका करताना देशात घटना पायदळी तुडवण्याचे काम सुरु असून त्या विरोधाच्या लढाईत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. तसेच संभाजी बिग्रेडची मजबूत फळी असून त्याचा फायदा मविआला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विलास शिंदे यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलणार्‍यांवर टीका करत महायुतीला उमेदवार मिळत नसल्याबाबत टीका केली. संभाजी ब्रिगेडने भाजपला नेस्तानाबूत करण्यासाठी महाविकास आघाडिला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक उमेदवारांची नावे चर्चेत असूनही महायुतीच्या उमेदवाराचे नाव अजून निश्चित झालेले नाही मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार जोरदार सुरु आहे . सोमवारी शिवसेना कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत २९ एप्रिल रोजी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. यावेळी संभाजी बिग्रेडचे पदाधिकारी अतुल वाघ, नितीन रोटे पाटील, आकाश छाजेड, कोंडाजी मामा आव्हाड, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन आठवड्यापासून राजाभाऊ वाजे यांचा तर दिंडोरीत भास्कर भगरे यांचा जोरदार प्रचारही सुरू आहे. हे दोन्ही उमेदवार २९ एप्रिलला शालिमार येथील शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचारफेरी काढतील. त्यानंतर एकत्रितपणे अर्ज सादर करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ घेण्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. उद्धव ठाकरे यांची वेळ मिळाली, तर गुरुवारी (ता. २) अर्ज दाखल करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी ठेवली असल्याचे काही पदाधिकारी म्हणाले. यावेळी संभाजी बिग्रेडने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.

विजय करंजकर गेलेच नाही
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी अंतिम झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभेसाठी तयारी केलेले विजय करंजकर यांनी बंडाचा भूमिका घेत मी निवडणूक लढणार असे जाहीर केले आहे. करंजकर यांना १४ एप्रिल रोजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मातोश्री येथे समजूत घालण्यासाठी बोलवले होते मात्र ते गेले नाहीत त्यामुळे हा तिढा अद्यापही कायम असलायचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी