30 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांना आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली होती यावरून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला होता. असाच प्रकार पुन्हा नाशिक लोकसभा मतदारसंघात घडला आहे. येथील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएमला हार घातला. याप्रकरणी आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आज मतदानाच्या दिवशी त्र्यंबकेश्वरमधील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनला हार घातला.

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली होती यावरून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला होता. असाच प्रकार पुन्हा नाशिक लोकसभा मतदारसंघात घडला आहे. येथील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) ईव्हीएमला हार घातला. याप्रकरणी आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आज मतदानाच्या दिवशी त्र्यंबकेश्वरमधील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनला (EVM machine) हार घातला.(Shantigiri Maharaj garlands EVM machine, case may be registered against Shantigiri Maharaj)

शांतिगिरी महाराज म्हणाले, आम्ही सर्व गोष्टींमध्ये देव बघतो, ईव्हीएममध्ये पण देव आहे. मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केली. ईव्हीएम मशीनला हार घालण्यापूर्वी शांतिगिरी महाराजांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पुजा करून वंदन केले. हा सर्व प्रकार आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील माहिती मागवली आहे. शांतिगिरी महाराज म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरांने मला आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.

शांतिगिरी महाराजांनी आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यापूर्वी हार घालून नमस्कार केला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे. आपण ईव्हीएम मशिनला हार घातला नाही तर मशिनच्या बाहेर लावलेल्या भारत मातेच्या फोटोला हार घातल्याचे स्पष्टीकरण शांतिगिरी महाराज यांनी केले आहे. माझे हे कृत्य नियमांचे उल्लंघन आहे याची आपल्याला कल्पना नव्हती. नियम तोडण्याचा माझा उद्देश नव्हता. निवडणूकांत पैसे आणि दारू वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. आमच्यावर मात्र गुन्हा दाखल झाला आहे. आमच्या विरोधात हे कारस्थान असल्याचे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी