31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ कवी, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळेसकर यांची अखेर प्राणज्योत मालवली

ज्येष्ठ कवी, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळेसकर यांची अखेर प्राणज्योत मालवली

प्राची ओले, टीम लय भारी

मुंबई :- मराठीतील ज्येष्ठ प्रख्यात कवी, प्रगतिशील लेखक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी सतीश काळसेकर यांचे निधन झाले. शुक्रवारी रात्री त्यांनी, पेण मध्ये रहात्या घरी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यु झाला (Poet, social activist Satish Kaleskar passes away).

सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे या गावी झाला. सतीश काळसेकर यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्गातच झाले. गावी मॅट्रिक पर्यंतच शिक्षण पूर्ण करून, ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. मुंबईच्या भवन्स महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. (ऑनर्स) केले. येथूनच त्यांनी त्यांच्या काव्यलेखणाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवा काळ, मराठा यांसारख्या वर्तमानपत्रांत त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रौप्यपदक विजेता मीराबाई चानू यांचे केले अभिनंदन

पुराच्या तडाख्यातून तब्बल 90 हजार लोकांना वाचविले, सरकारचा दावा

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ज्ञानादूत, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी केली. त्यानंतर 1965 ते 2001 पर्यंत त्यांनी बँक ऑफ बडोदा येथे नोकरी केली. 1971 मध्ये त्यांचा पहिला कवितसंग्रह ‘इंद्रियोपनिषद’ प्रकाशित झाला आणि तिथून त्यांच्या कवी या वाटचालीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी साक्षात (1982), विलंबित (1997) असे कवितासंग्रह लिहिले.

तसेच त्यांनी 1977, लेनिनवरच्या विश्वातील कविता अनुवाद व संपादन, नव्या वसाहती (2011) अरुण कमल यांच्या हिंदी इलाके में कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद केले. रोजनिश (2010), पायपीट (2015) असे गद्यलेखन केले. सांस्कृतिक ठेवा (2007) व निवडक अबकडइ (2012) अरुण शेवते सह संपादन केले.

Poet social activist Satish Kaleskar passes away
सतीश काळसेकर

शिल्पा शेट्टीला दुहेरी चिंता; नवरा तुरुंगात तर नवा चित्रपट अपयशाच्या सावटाखाली

Maharashtra rains live update: IMD issues yellow alert for Thane, Palghar; orange for Raigad, Ratnagiri

सतीश काळसेकर यांच्या कवितांचा हिंदी, बंगाली, पंजाबी, इंग्लिश, मल्याळम यांसह अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. कनिष्ठ मध्यमवर्गातून आलेला चाकरमानी, त्याची  सुख दुःख, तीव्र संवेदनशीलता, सोशिकपणा हे त्यांच्या कवितांचे विषय आहेत. महानगरीय जीवन जगताना वेगवेगळ्या प्रसंगात येणारे भावनात्मक अनुभव हा त्यांच्या कवितेचा मुळ गाभा आहे. त्यांचे पायपीट हे गद्यलेखन हे भारतातील विविध ठिकाणी पायी केलेल्या प्रवासाच्या अनुभवावर आधारलेले आहे. प्रवास लेखन, सांस्कृतिक चळवळी, खाद्यलेखन यांसारख्या विषयांवर तत्यांनी अनेक नियतकालिकातून लेख लिहलेत. लघुनियतकालिकांच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता (He was instrumental in the short-term movement).

साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे 1998 ते 2001 पर्यंत ते सदस्य होते. अशा या उत्तम लेखक, कवीला त्यांच्या वाड्मयीन कार्यासाठी- सोव्हिएत लँड नेहरू (1997), लालजी पेंडसे पुरस्कार (1997) बहिणाबाई पुरस्कार : कवी (1998) कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद (1998), महाराष्ट्र शासन पुरस्कार (1999), कैफी आझमी (2006), महाराष्ट्र शासन पुरस्कार, कृष्णराव भालेकर (2010- 11), सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार (2013), साहित्य अकादमी पुरस्कार (2015), महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार (2019) अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

कवी सोबतच ते सामाजिक कार्यकर्ते देखील होते. मार्क्सवादी विचारसरणीच्या चळवळीतील सक्रिय नेते होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या वरील सगळा जीवनप्रवास लक्षात घेता ते मानवतावादी होते हे प्रकर्षाने जाणवते. अशा या थोर कवीला टीम लय भारी कडून भावपूर्ण श्रद्धांजली… (A heartfelt tribute to this great poet from Team Lay Bhari…)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी