29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयनाना पटोले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार

नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार

टीम लय भारी

नागपूर:- नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजप विरोधात कंबर कसली आहे. पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन असे वक्तव्य पटोले यांनी केले आहे. महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे (Nana Patole expected contest against Devendra Fadnavis).

आज नाना पटोले यांच्या उपस्थितीत नागपूर येथे काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. या बैठकीत बोलताना पटोले यांनी मोठं विधान केलंय. पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन असे वक्तव्य पटोले यांनी केले आहे. महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे. काँग्रेसकडून नागपूर महापालिका निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी नाना पटोले यांनी जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रौप्यपदक विजेता मीराबाई चानू यांचे केले अभिनंदन

पुराच्या तडाख्यातून तब्बल 90 हजार लोकांना वाचविले, सरकारचा दावा

पहिल्या दिवशी नागपुरातील तीन विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीचं नियोजन करण्यात आले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून नाना पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष भाजपला त्यांच्याच मतदारसंघातून पराभूत करण्याची रणनीती नाना पटोलेंनी आखल्याचे पाहायला मिळत आहे ( Nana Patole has devised a strategy to defeat the BJP).

Nana Patole expected contest against Devendra Fadnavis
नाना पटोले

काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणूकीची तयारी सुरु केलीय. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले.

पुराच्या तडाख्यातून तब्बल 90 हजार लोकांना वाचविले, सरकारचा दावा

Congress’ Nana Patole wants to fight solo in Maharashtra, but data says it’s not a good idea

यंदा काहीही करुन नागपूर महापालिकेवरचा भाजपचा झेंडा खाली उतरवायचा, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. आतापासूनच काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने आजची महत्त्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावली. पण या बैठकीला काँग्रेसचे नेते उर्जामंत्री नितीन राऊतांनी गैरहजेरी लावली आहे (Congress leader Nitin Raut has been absent from the review meeting).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी