31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रबंडातात्या कराडकर यांच्या अटेकेनंतर प्रविण दरेकरांचा राज्य सरकारला खोचक टोला

बंडातात्या कराडकर यांच्या अटेकेनंतर प्रविण दरेकरांचा राज्य सरकारला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मात्र, आज पंढरीची पायी वारीला जात असतांना कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे (Pravin Darekar has criticized the state government Warkaris).

देशात कोरोनाची तिसरी लाट येत आहे. त्यामळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राज्य सरकारने पायी वारी जाण्याची मागणी नाकारली आहे. मात्र यावर्षी पायी वारी व्हायलाच हवी अशी भूमिका वारकरी समाजाने घेतली आहे. त्यामुळे आज पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे (Kirtankar ha. B. W. Police have arrested some Warkaris including Bandatatya Karadkar).

चुकीला माफी नाही, राजन विचारेंनी शिवसैनिकाला लगावला फटका

येत्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन, जिल्हा जनविकास आघाडी एकत्र

यावर प्रवीण दरेकर म्हणाले, हा महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे. हे सरकार आता वारकऱ्यांनासुद्धा सोडत नाही. अशाप्रकारे राज्य सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे (Praveen Darekar has criticized the state government for muscat pressure on Warkaris).

Pravin Darekar has criticized the state government Warkaris
प्रविण दरेकर

बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर…

EOW probe old in misappropriation case politically motivated: Opposition leader Darekar

यानंतर प्रविण दरेकर म्हणाले, कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे, तर असे असताना वाईन शॉप, बार सुरु करण्याची परवनागी देण्यात येते. मात्र, लाखो भक्तांची श्रध्दास्थाने असलेली मंदिर मात्र उघडण्यास राज्यसरकारकडून परवानगी का दिली जात नाही असा सवाल प्रविण दरेकरांनी राज्यसरकारला केला आहे (This question has been asked by Pravin Darekar to the state government).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी