33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईचुकीला माफी नाही, राजन विचारेंनी शिवसैनिकाला लगावला फटका

चुकीला माफी नाही, राजन विचारेंनी शिवसैनिकाला लगावला फटका

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लसीकरण मोठ्या संख्येने सुरू आहे. मात्र, ठाण्यात गेले दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आज शिवसेना खासदार राजन विचारे यांच्यातर्फे लसीकरण आयोजित करण्यात आले आहे. परंतु लसीकरण सुरू असतांना याठिकाणी खासदार राजन विचारेंनी शिवसैनिकावर संतापून फटका लगावला (MP Rajan Vichare angrily attacked Shiv Sainik).  

गेल्या दोन दिवासांपासून ठाण्यात लसीकरण बंद आहे. त्यामुळे खासदार राजन विचारे यांच्यातर्फे ठाण्यातील चंदनवाडी येथील शुभम मंगल कार्यालय येथे लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस लसीकरण बंद असल्याने या ठिकाणी लसीकरणासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, एक शिवसैनिक यावेळी त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना लसीकरणासाठी आत सोडत होता. राजन विचारेंनी हे पाहिल्यानंतर ते संतापले संबंधित शिवसैनिकाला राजन विचारे यांनी छातीवर फटका लगावला (Rajan Vichare hit Shiv Sainik on the chest).

येत्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन, जिल्हा जनविकास आघाडी एकत्र

बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर…

नागरिकांना योग्य वेळी लस मिळावी यासाठी राजन विचारेंनी लसीकरणाचे आयोजन केले होते. ठाण्यात गेले दोन दिवस लसीकरण बंद असल्यामुळे या ठिकाणी लसीकरणासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यासाठी नागरिकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. त्यामुळे ओळखीच्या माणसांना आत मध्ये न सोडण्याचे विचारेंनी सर्व शिवसैनिकांना बजावले होते. परंतु एक शिवसैनिक गेटमधून आपल्या ओळखीच्या लोकांना आत सोडत होता. त्यामुळे तेथील नागरिकांनी आरोप केला. यावरच राजन विचारे संतापले, गेटवर असणाऱ्या शिवसैनिकाला राजन विचारे यांनी फटका लगावला.

MP Rajan Vichare angrily attacked Shiv Sainik
राज विचारे

आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा, संभाजी ब्रिगेडचे प्रत्युत्तर

https://english.lokmat.com/maharashtra/video-mp-rajan-vichare-slaps-shiv-sainik-after-citizens-create-ruckus-at-vaccination-center/

राजन विचारे यांच्यातर्फे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी लसीकरणाचे फक्त तीनशे डोसच होते. ठाण्यात दोन दिवस लसीकरण बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यासाठी नागरिकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गर्दी लक्षात घेता फक्त दोनशे जणांचे लसीकरण करण्याचे ठरवण्यात आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी