31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रबारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर...

बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर…

टीम लय भारी

मुंबई :- राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. मूल्यमापनची ही पद्धत बारावी सीबीएसई बोर्डसारखीच असणार आहे (Twelfth result evaluation method announced).

31 जुलै पर्यंत बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावे असे सर्वोच्च न्यायालयाने राज्य बोर्डाना सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बोर्डाने आता बारावीचे निकाल कोणत्या मूल्यमापन पद्धतीवर आधारित असणार हे निश्चित केले आहे (It has been decided on which evaluation method the result of class Twelfth will be based).

आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा, संभाजी ब्रिगेडचे प्रत्युत्तर

भारत-मालदीव संबंध धोक्यात?

बारावीच्या निकालाचे मूल्यमापन हे 10 वी चे 30% गुण, 11 वी चे 30% गुण आणि 12 वी चे 40% गुण या पद्धतीवर आधारित असणार आहेत. यामध्ये 10 वीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेले 3 विषयांवर 30% गुण दिले जातील. गेल्या वर्षी ही कोरोणामुळे 11 वी च्या परीक्षा या होऊ शकल्या नाहीत म्हणून 11 वी च्या वार्षिक मूल्यमापनावर 30% गुण दिले जाणार. तर 12 वी चे 40% गुण हे प्रथम सत्र, सराव परीक्षा, सराव चाचण्या यावर अवलंबून असणार.

Twelfth result evaluation method announced
बारावीचा निकाल

दारे खिडक्या असता बंद, पाठविले ऐसे गतीमंद; मिटकरींनी काढला पडळकरांना चिमटा

CBSE CISCE Class 12th Results 2021 Updates: New guidelines issued to help schools in result preparation

‘वरील मूल्यमापनाच्या आधारावर मिळालेल्या गुणांवर विद्यार्थी नाखूष असेल तर राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या सुधारित योजनेतंर्गत त्याला दोन परीक्षेच्या संधी उपलब्ध होतील जेव्हा कोविड परिस्थिती सामान्य होईल’, असे शिक्षणमंत्री वर्षा गाकवाड म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी