28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रCorona Vaccination : महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी : टोपे

Corona Vaccination : महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी : टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले रक्तदान करण्याचे आवाहन

टीम लय भारी

मुंबई : अनेक कंपन्यांच्या कोरोना लस (Corona Vaccination) अंतिम टप्प्यात असून लवकरच देशात लसीकरण (Covid-19 Vaccination) सुरु होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात कशा प्रकारे लसीकरण होणार? प्राधान्यक्रम काय असणार? या विषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राज्यात रक्तसाठा कमी असल्याने लोकांना रक्तदानासाठी प्रेरीत करण्यासाठी राजेश टोपे यांनी आज रक्तदान केलं. त्यानंतर ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 13 ते 20 तारखेपर्यंत स्वाभीमान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या काळात रक्तदान मोहिम राबवली जाणार आहे. आज रक्तदान करून आम्ही इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन करतो. राज्यात 4 ते 5 दिवसांचेच रक्त शिल्लक असल्याची माहिती टोपे यांनी दिली. महाराष्ट्रात सरकारी रूग्णालयात मोफत रक्त देणार, एकही पैसा घेणार नाही. याची अंमलबजावणी 12 डिसेंबरपासून होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.

कोरोना लस प्राधान्यक्रमाने दिली जाणार

कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर 50 वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरण पूर्ण झाल्यावर सर्व 50 वर्षांखालील लोकांना लस देण्यात येणार आहे. 11 कोटींपैकी 3 कोटी लोकांना लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. यादी तयार करुन मतदान बूथप्रमाणे लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर 30 मिनिटे तिथं बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस वाशी येथील केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी 16 हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचंही टोपे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी