30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराहुलची कर्तबगारी चीनी दाम्पत्याला आवडली, संगमनेरमध्ये मुलीचे केले कन्यादान

राहुलची कर्तबगारी चीनी दाम्पत्याला आवडली, संगमनेरमध्ये मुलीचे केले कन्यादान

संगमनेर येथील सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या राहुल हांडे याची कर्तबगारी चीन मधील एका दाम्पत्याला आवडली. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीसोबत लग्न करावे असा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला. राहुलने देखील तो प्रस्ताव मान्य केल्याने चीनची मुलगी आता संगमनेरची सुन झाली आहे. या मुलीचे नाव यान छांग असे असून तीचा राहुलसोबत विवाह पार पडला आहे.

राहुल हांडे (वय २९) हा संगमनेर तालुक्यातील (जि. अहमदनगर) भोजदरीगाव या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. तो योग प्रशिक्षक आहे. योग प्रशिक्षणाचे त्याने शिक्षण घेतले आहे. राहुलने निसर्गोपटारक डिप्लोमाचे शिक्षण घेतल्यानंतर योग विषयात त्याने पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण देखील घेतले. त्यानंतर योगामध्ये करियर करण्यासाठी तो चीनमध्ये गेला. चीनमधील मकाऊ येथे त्याने स्वत:चे योग केंद्र सुरु केले.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांच्या बैठकीच्या वाटेत अडचणींचे काटे; एमईटीच्या ट्रस्टीचा विरोध

गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचे अजित पवारांना खडेबोल

सई मांजरेकरचा डिस्को डान्सा… फोटो पाहून चाहते घायाळ

राहुलची योगा क्षेत्रातील प्रगती पाहुन चीनमधील योंग छांग आणि त्यांची पत्नी मेई लियान खुपच प्रभावीत झाले. त्यांनी आपली ३१ वर्षीय मुलगी यान छांग हिच्यासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव राहुल समोर ठेवला. राहुलने देखील हा प्रस्ताव मान्य केला. घारगाव येथे सोमवारी (दि. ३ रोजी) राहुल आणि यान यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला मोठ्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी