31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रराजेश टोपे यांची घोषणा, आता तालुका स्तरावरही डायलिसीस सुविधा

राजेश टोपे यांची घोषणा, आता तालुका स्तरावरही डायलिसीस सुविधा

टीम लय भारी

मुंबई :- ग्रामीण भागातील रूग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केली आहे की, राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर असणारी डायलिसीस सुविधा आता तालुकास्तरावर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सामन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे. आता ग्रामीण भागातील रुग्णांना डायलिसीस जिल्ह्यास्तरावरील रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही.

तसेच ग्रामीण भागात परवडणाऱ्या किंमतीत डायलिसीसची सुविधा उपलब्ध होण्यासाठी पेरिटोनिअल डायलिसीसच्या वापराबाबत ऍपेक्स फाऊंडेशनने पुढाकार घेऊन शासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे. कोरोनाच्या काळात मध्ये ग्रामीण भागात ज्यांना कोरोनाची लागण झाली होती परंतु त्यांना डायलिसीस सुविधा उपलब्ध नससल्यामुळे त्यांनी त्याचा जीव गमावला आहे.

 

कोरोनाच्या काळात डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञांनी कोरोना रूग्णांना डायलिसीसची सेवा दिली या सर्वांनी केलेले काम लक्षणीय असून त्याला सलाम करतो. राज्याच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनमध्ये मुत्रपिंड प्रत्यारोपणाचा समावेश असून त्यासाठीची रक्कम वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी