31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार देवेंद्र भुयार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नारळ मिळणार !

आमदार देवेंद्र भुयार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नारळ मिळणार !

टीम लय भारी

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भूयार यांना राज्यमंत्री पद हवे आहे. राज्यमंत्री पदाचे स्वप्न साकार होत नसल्याने त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत फारकत घेतली आहे (MLA Devendra Bhuyar will Be exit from Swabhimani Shetkari Sanghatana).

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला लागून ते शेतकरी चळवळ विसरले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच संघटनेतून नारळ मिळणार असल्याची माहिती विश्वसणीय सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली (MLA Devendra Bhuyar forgot farmers movement).सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक मंत्रीपद देण्याचा शब्द शरद पवार यांनी राजू शेट्टी यांना दिला होता.

त्यानुसार राष्ट्रवादीने एक कॅबिनेट पद देवू करायला हवे. या पदावर राजू शेट्टी यांना संधी द्यायला हवी. त्यासाठी शेट्टी यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व सुद्धा राष्ट्रवादीने द्यायला हवे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना मात्र मंत्रीपदाची संधी आपल्यालाच मिळायला हवी असे वाटते. शिवसेनेने आपल्या कोट्यातून बच्चू कडू यांना मंत्रीपद दिले आहे. त्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी एकमेव आमदार असल्याने मलाही राज्यमंत्रीपद द्यायला हवे, असे भुयार यांचे म्हणणे आहे (MLA Devendra Bhuyar interested for Ministership).वास्तवात, देवेंद्र भुयार हे फार नवखे आमदार आहेत.

आमदार म्हणून काम कसे करायचे हे त्यांनी अगोदर शिकायला हवे. पण ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्या’च्या मागे अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे अनेकदा हट्ट सुद्धा धरल्याचे या सूत्रांनी सांगितले (MLA Devendra Bhuyar had met to Raju Shetti for Ministership).राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यात काडी टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजू शेट्टी तयार असतील तर तुम्हाला आम्ही राज्यमंत्रीपद देवू असे लाल गाजर जयंत पाटील यांनी देवेंद्र भुयारांना दाखविले आहे. त्याला देवेंद्र भुयार भुलले असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले ( Jayant Patil has given assurance to MLA Devendra Bhuyar for Ministership).

देवेंद्र भुयारांच्या निवडणुकीसाठी राजू शेट्टींनी घर विकले होते

राज्यमंत्रीपद मिळत नसल्याने देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत जवळपास सर्व संबंध तोडून टाकले आहेत. ते चळवळीत सक्रीय राहिलेले नाहीत. आमदार होण्यापूर्वी ते चळवळीत सक्रीय होते (MLA Devendra Bhuyar was social activist).
चळवळीतील भुयार यांचे चांगले काम लक्षात घेवून राजू शेट्टी यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीशी वाटाघाटी करून हा मतदारसंघ भुयार यांना मिळवून दिला होता. भुयार निवडून यावेत म्हणून राजू शेट्टी यांनी मुंबईतील स्वतःचे घर विकले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देणगी गोळा करून भुयार यांना मदत केली होती. परंतु भुयार यांना याची जाणीव राहिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुसरा सदाभाऊ खोत होवू नये…

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सदाभाऊ खोत यांच्यासाठी राजू शेट्टी यांनी सुरूवातीला आमदारकी मिळवून दिली. नंतर मंत्रीपद सुद्धा मिळवून दिले. परंतु सदाभाऊ खोत यांना सत्तेची चटक लागली, अन् ते शेतकरी चळवळ विसरून गेले. एवढेच नव्हे तर, सत्तेच्या नादात त्यांनी शेतकरी चळवळीत फूट पाडण्याचेही काम केले, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद मिळाले तर ते सुद्धा सदाभाऊ खोत यांच्यासारखेच वागतील. सदाभाऊ खोत यांचा दुसरा अंक होऊ नये म्हणून भुयार यांना राज्यमंत्री पद देण्यास कार्यकर्त्यांचा विरोध आहे.

भुयार हे स्वतःची तुलना बच्चू कडू यांच्याशी करतात. परंतु बच्चू कडू हे अनेक टर्म आमदार राहिलेले आहेत. आमदारकीचा उपयोग लोकांसाठी कसा करायचा हे बच्चू कडू यांना ठावूक आहे. बच्चू कडू यांच्याप्रमाणे भुयार यांनीही अनुभव प्राप्त करून घ्यावा. तीन – चार टर्म आमदार म्हणून निवडून आल्यानंतर भविष्यात त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी संघटनाच प्रयत्न करेल. पण आता त्यांनी मंत्रीपदासाठी सुरू ठेवलेला हट्ट चुकीचा असल्याचे सूत्रांनी सांगितले (MLA Devendra Bhuyar on wrong way).

आमदार भुयार यांच्या मतदारसंघात राजू शेट्टींचा मेळावा

आमदार भुयार यांच्या मोर्शी या मतदारसंघात राजू शेट्टी लवकरच एक सभा घेणार आहेत. त्या अगोदर ते एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. त्यावेळी भुयार यांच्याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करतील, असे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी भुयार यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. भुयार निवडून येण्यासाठी शेट्टी यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांनी मोर्शीच्या मतदारांना आवाहन केले होते.त्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी पुन्हा मोर्शी मतदारसंघात जावून मतदारांशी संवाद साधणार आहेत. भुयार यांच्याविषयी ते मतदारांजवळ आपल्या भावना व्यक्त करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी