30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
HomeसंपादकीयCheeta : मोरांना खेळवणाऱ्या पंतप्रधानांना चित्त्यांची भेट

Cheeta : मोरांना खेळवणाऱ्या पंतप्रधानांना चित्त्यांची भेट

या चित्त्यांना आणण्यासाठी खास विमान तयार करण्यात आले आहे. ते विमान नामिबियामध्ये रवाना झाले आहे. आफ्रिकेतील नामिब‍िया येथून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तीमत्त्व संपूर्ण जगाला आकर्षीत करणारे आहे. त्यांचा वाढदिवस दोन दिवसांवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी ऑगस्ट 2019 मध्ये बेअर ग्र‍िल्स बरोबर वाइल्डलाईफ यात्रा केली होती. बेअर ग्र‍िल्स हा एक साहस वीर आहे. तो घनदाट जंगलात फ‍िरतो. त्यावेळी भारताचे पंतप्रधान मोदींची विशेष चर्चा झाली होती. तसेच अनेक वेळा मोरांबरोबर खेळतांना त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन त्यांचे पक्षी आणि प्राण्यांचे प्रेम अधोरेखीत होते. 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून आपल्या देशात 8 चित्ते (Cheeta) येणार आहेत.

या चित्त्यांना आणण्यासाठी खास विमान तयार करण्यात आले आहे. ते विमान नामिबियामध्ये रवाना झाले आहे. आफ्रिकेतील नामिब‍िया येथून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात येणार आहेत. केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात पाच नर आणि तीन मादी या उद्यानात सोडण्यात येणार आहेत. प्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाची सुरूवात होणार आहे.

त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. या चित्त्यांना पहिल्यांदा खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात सोडण्यात येईल. पहिल्या टप्प्यासाठी 14 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. एकूण 14 चित्ते भारतात येणार आहेत. त्यापैकी 8 चित्ते दोन दिवसात भारतामध्ये पोहोचतील. 1952 साली भारत सरकारने चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाल्याचे जाहिर केले होते.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणविसांच्या कार्यालयाबाहेर ‘ED’ चा फलक

Narayan Rane : नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला प्रगतीचा मंत्र

Mumbai Toilet Story : मुंबई महापालिका घडवते शौचालय सम्राट!

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज स‍िंह चौहान यांनी आढावा घेतला. वनमंत्री विजय शहा यांनी देखील भेट दिली. यामध्ये 4 नर आणि 4 मादी आहेत. भारतातून चित्ते नामशेष झाले आहे. या घटनेला 70 दशके उलटली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे आपल्याला चित्त्यांचे दर्शन घेता येणार आहे. नमिबियमध्ये मोठया संख्येने चित्ते आहेत. सुमारे 3000 चित्ते नामबियात आहे. मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशलन पार्कमध्ये त्यांना काळव‍िट, रानडुकरे, ससे असे प्राणी खाण्यासाठी आहेत. त्यांना भरपूर मेजवानी मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी