31 C
Mumbai
Thursday, November 16, 2023
घरमहाराष्ट्रभुजबळ खोटे बोलून शपथविधीला गेले, शरद पवारांचा पलटवार

भुजबळ खोटे बोलून शपथविधीला गेले, शरद पवारांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अकोल्यात जोरदार पलटवार केला आहे. काल छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी 2014 पासून महाराष्ट्रातील राजकारण कसे ढवळून काढले, भाजपशी आधी चर्चा, बैठका आणि नंतर कायमस्वरुपी पाठिंबा गृहित धरू नका, असा दिलेला इशारा याबाबत भुजबळांनी शरद पवारांवर कठोर टीका केली होती. त्यावर आज शरद पवार काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे आणि अभ्यासकांचे लक्ष लागले होते. पण छगन भुजबळांनी विचारलेल्या प्रश्नांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे म्हणत भुजबळ कसे खोटे बोलले, हे सांगत शरद पवारांनीच भुजबळांवर पलटवार केला. त्याचवेळी अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न असल्याचेही पवार म्हणाले.

भुजबळांनी कोणते आरोप केले होते?

शरद पवारांनी 2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचे ठरवले होते. याबाबतची सर्व चर्चा झाली होती. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला, असा आरोप भुजबळांनी कालच्या मुलाखतीत केला होता.
2014 मध्ये भाजपने शिवसेनेची युती तोडल्यानंतर भाजपने प्रथम सत्ता स्थापन करावी त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल, अशी चर्चा झाल्याचाही गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केला होता. तसेच शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांना पक्षाचे अध्यक्ष करण्याचे ठरले होते आणि पवारांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहीत नव्हेत, असाही आरोप भुजबळांनी केला होता.

भुजबळांच्या आरोपांना पवारांचे उत्तर

भाजपसोबत जाण्याचा काहींचा आग्रह होता, ही बाब पवारांनी मान्य केली. तर सुप्रिया सुळे यांना पक्षाचे अध्यक्ष करावे, हा छगन भुजबळ यांचाच प्रस्ताव होता, असे पवारांनी स्पष्ट केले. भुजबळांचा तो प्रस्ताव स्वीकारला नाही, याकडेही पवारांनी लक्ष वेधले. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची पुढची पायरी होती ती आम्हाला मान्य नव्हती. पण ती पायरी कोणती होती, हे शरद पवारांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान, छगन भुजबळ हे खोटे बोलून अजित पवारांच्या शपथविधीला गेले आणि तिथे मंत्रिपदाची शपथ घेतली, असा पलटवार शरद पवार यांनी केला. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही फूट पाडली नाही, असे सांगत त्यांनी भुजबळांना जोरदार टोला लगावला.

हे ही वाचा 

‘अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही’ शरद पवारांनी केले भाकीत

100 कोटी वसुली करणारा गृहमंत्रीच का आवडतो..चित्रा वाघ सुप्रिया सुळेंबद्दल अशा का बोलल्या?

‘नरेंद्र मोदी बापात बाप लेकात लेक ठेवणार नाहीत,’ प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

प्रकाश आंबेडकरांनाही पवारांचे प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीतील मतभेदांवर जोरदार टीका केली होती. शरद पवार अदानींसोबत असतात आणि राहुल गांधींचा अदानींना विरोध आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, गुजरातमधील एका शेतकऱ्यानं दूधापासून नवीन औषध करण्याचा कारखाना निर्माण केला. त्याच्या उद्घाटनाला मला आणि गौतम अदानींना आमंत्रित केले होते. सार्वजनिक कार्यक्रमात वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले म्हणजे ती त्यांची राजकीय भूमिका नसते, असे उत्तर पवारांनी आंबेडकरांना दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी