29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रदेशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी साईबांबाचे दर्शन घेत, घेतला प्रसादाचा आस्वाद

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी साईबांबाचे दर्शन घेत, घेतला प्रसादाचा आस्वाद

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी साईबांबाच्या समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर प्रथम त्यांनी द्वारकामाईचे दर्शन घेतले. समाधी मंदिर दर्शनानंतर गुरुस्थान मंदिर येथील निंबवृक्षास प्रदक्षिणा घातली. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी साईबांबाची पाद्यपूजा आणि आरती केली. साईबाबा संस्थानच्या वतीने साईबांबाची मूर्ती आणि शाल देऊन राष्ट्रपती मुर्मू यांचा सन्मान करण्यात आला. अनेक भक्त जसे साईदर्शनानंतर साई संस्थानच्या प्रसादालयात जाऊन भोजन घेतात तसे राष्ट्रपतींनीही येथे भोजन केले. साई संस्थाननेही त्यासाठी खास तयारी केली होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेणाऱ्या देशाच्या सहाव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. शुक्रवारी जवळपास तीन तास त्या शिर्डीत होत्या. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींसाठी मटकीची उसळ, मेथीची भाजी, पिठले वडी, साध वरण- भात, गावरान तुपाचा शिरा, बटाटा वडापाव, सलाड, पापड आणि चटणी या पदार्थांचे जेवणाचे ताट करण्यात आले होते. खास महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेली शेंगदाणा चटणी राष्ट्रपतींना विशेष आवडली. त्यामुळे राष्ट्रपतींनी ही चटणी कशी बनविली जाते याची चौकशी साई संस्थानच्या आचाऱ्यांकडे करत ती बनविण्याची पद्धत जाणून घेतली. राष्ट्रपतींनीही भोजन केल्यानंतर दररोज किती लोक जेवतात याची माहिती घेत भोजनाच्या गुणवत्तेचे आणि व्यवस्थेचे कौतुक केले.

हे सुध्दा वाचा:

एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस जारी; आमदारांच्या आपत्रतेबाबत लवकरच निर्णय

शरद पवार यांच्यासोबत 44 आमदार; पवारांच्या कट्टर समर्थकाचा दावा

खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!

साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या वस्तुसंग्रहालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिली. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर यांनी त्यांना वस्तुसंग्रहालयातील वस्तू आणि प्रतिमांविषयी माहिती दिली. यावेळी नााशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नााशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री. साईबाबा संस्थानच्या समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगुडा, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी