32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमामा भाचाच्या विरोधामुळे शिवसेनेच्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मामा भाचाच्या विरोधामुळे शिवसेनेच्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

टीम लय भारी

वर्धा :- वर्ध्यातील हिंगणघाट मतदारसंघात 15 वर्षे प्रतिनिधित्व करत असलेले शिवसेनेचे अशोक शिंदे हे आज शिवबंधन तोडून कॉंग्रेसचा झेंडा हातात घेणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित झाला आहे (Shiv Sena leader joins Congress due to opposition from Mama Bhacha).

हिंगणघाट मतदारसंघात अशोक शिंदे हे सन 1995, 1999 व 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना अशोक शिंदे हे राज्यमंत्री राहिले आहे. सध्या अशोक शिंदे हे शिवसेनेचे उपनेते आहे.

आमिरचा लाल सिंग चड्डा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात…

पालघरमध्ये होतोय खाजगी लसीकरणांचा काळाबाजार

वर्ध्याचे संपर्क प्रमुख माजी खासदार अनंत गुढे यांचे अशोक शिंदे सोबत तीव्र मतभेद असल्याने शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमात उपनेते अशोक शिंदे यांना डावलत असल्याने मतभेदाचे वाद शिवसेना प्रमुखपर्यंत पोहचला मात्र मातोश्री वरून कोणतेही उत्तर आले नाही त्यामुळे नाराज झालेले अशोक शिंदे हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत (Ashok Shinde will join the Congress today).

अशोक शिंदेच्या स्वगृहात मामा भाचाच्या भाजपला सुरुंग

हिंगणघाट शहर हे अशोक शिंदेचे स्वगृह आहे येथील नगर परिषेद मध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र भाजप मध्ये नाराज असलेलं नगरसेवक यांनी शिवसेना बंधन बांधले असल्याने सध्या मामा भाचाची शिवसेना प्रमुखजवळ छाती फुगली आहे. त्यामुळे शिंदेच्या स्वगृहात भाजपला सुरुंग लावून जिल्ह्यात वर्चस्व वाढवण्याचे काम केले आहे. मात्र हे आयराम आता खरच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार का हा प्रश्न आहे. हिंगणघाट मतदार संघात अशोक शिंदेंना डावलून शिवसेनेचा आमदार निवडून आणण्याचे दिवसा स्वप्न पाहणारे अनंत गुढे किती यशस्वी होतात हे येणाऱ्या काळाच सांगेल.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नामनियुक्त सदस्यांसंबंधित याचिकेबाबत राज्यपाल कोश्यारींचे दुर्लक्ष

After Spying Charge Against Maharashtra Allies, Congress Leader’s Retreat

Shiv Sena leader joins Congress due to opposition
अशोक शिंदे

अशोक शिंदेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसणार?

जिल्ह्यातील आठही तालुक्यात अशोक शिंदे यांची चांगली पकड आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गावांत गाव तिथे शिवसेना शाखा उघडली गेली आहे. त्यामुळे आता अनेक जण शिवसेनेचा शिवबंधन तोडणार का हे पाहणे औचित्य ठरले आहे.

महाविकास आघाडी सरकार मध्ये चालले तरी काय?

राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आहे यात तिन्ही पक्ष आपले पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहे शिवसेना गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक, काँग्रेस पक्ष असो की राष्ट्रवादी काँग्रेस आपआपले पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एकमेकांच्या पक्षातील लोक घेतले जाणार नसल्याचे घोषणा केली गेली आणि येथे काँग्रेस ने आज शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांचा आज प्रवेश होणार आहे. त्यामुळे शिवसेनेत कुठेतरी नाराजी पाहायला मिळणार आहे (There will be displeasure somewhere in Shiv Sena).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी