32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeटॉप न्यूजकोरोना रूग्णांना होतोय 'बोन डेथ' नावाचा आजार

कोरोना रूग्णांना होतोय ‘बोन डेथ’ नावाचा आजार

मृगा वर्तक : टीम लय भारी

मुंबई :- कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मधुमेह, श्वसना संबंधित आजार, फुफ्फुसाचे आजार अशा अनेक प्रकारचे आजार होत असतात हे सिद्ध झाले आहे. निरीक्षणातून असे सिद्ध झाले आहे की काही रुग्णांना ‘बोन डेथ’ नावाचा एक अस्थीरोग होतो आहे (Corona patients suffer from a disease called Bone Death).

हा आजार जुना आहे. यापूर्वी या आजाराचे प्रमाण 2% होते. कोरोना काळात कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना हा रोग मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. 2% वरून 18% पर्यंत इतकी लक्षणीय वाढ झालेली आढळते.

मामा भाचाच्या विरोधामुळे शिवसेनेच्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आमिरचा लाल सिंग चड्डा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात…

अस्थीरोगतज्ञ डॉ. व्ही. एन. देशमुख यांनी सांगितले, “काही रुग्णांमध्ये इतके गंभीर परिणाम पहावयास मिळतात की शस्त्रक्रियेशिवाय उपाय उरत नाही. 23 वर्षांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक लहान वयाच्या रुग्णाची शस्त्रक्रिया डॉ. व्ही. एन. देशमुख यांनी स्वतः केली आहे” (The surgery of the youngest patient was performed by Dr. V. N. Deshmukh has done it himself).

Corona patients suffer from a disease called Bone Death
बोन डेथ

पालघरमध्ये होतोय खाजगी लसीकरणांचा काळाबाजार

Bone death threat looms for recovered Covid patients

या आजारात आपल्या शरीरातील हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा खंडित होतो. तसेच हाडातील बॉल खराब होतो. जुना मार, फ्रॅक्चर, स्टिरॉइड्सचा अति वापर, अतिमद्यपान, त्यालेसेमिया सिकल सारखे रक्तविकार आणि एड्स या आजारांमुळे या पूर्वी हा रोग होत होता. त्यात कोरोनाची भर पडली आहे. नागपुर येथील प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ. सुश्रुत बाभूळकर यांनीही या आजारात कोरोनानंतर लक्षणीयरीत्या वाढ झाल्याचे नोंदवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी