33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रयंदाही शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच...

यंदाही शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच…

एकनाथ शिंदे गटाने दोन दिवसांपूर्वी शिवाजी पार्क मैदानातून माघार घेतल्यानंतर शिवाजी पार्कवर दसऱ्याला ठाकरेंचा आवाज घुमणार हे निश्चित झाले आहे. कारण मुंबई महापालिकेने आज गुरुवारी (12 ऑक्टोबर) ठाकरे गटाला दसऱ्यासाठी शिवाजी पार्क मैदान वापरण्यात परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मागितली होती. त्यानंतर शिंदे गटानेही तशीच मागणी केली होती. अखेर ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांना शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेता आला. अशी वेळ यंदा येऊ नये म्हणून ठाकरे गटाने खूप आधी शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेत अर्ज केला होता. तसाच अर्ज एकनाश शिंदेंच्या शिवसेनेही केला होता. त्यामुळे यंदाही शिवाजी पार्क मैदान कुणाला, असा वाद होण्याची शक्यता होती.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने शिवाजी पार्क दावा सोडून क्रॉस आणि ओव्हेल मैदानात दसरा मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आज मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क देत असल्याचे लेखी पत्र आज दिले. ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या मंजुरीचे पत्र आज कार्यालयात जाऊन घेतले. याचाच अर्थ शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. त्यासाठी त्यांनी‘वाजत गाजत गुलाल उधळत यायचंच, साहेबांना दिलेलं वचन पूर्ण करायचंच, चलो शिवतिर्थ !’ असे ट्वीट दोन दिवसांपूर्वीच केले होते.


24 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. दरवर्षी शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. तेव्हापासून शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा, हे समीकरण बनले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षीही यात खंड पडलेला नाही आणि यंदाही ठाकरेंचाच मेळावा होणार आहे. यंदा ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी दोन दिवस शिवाजी पार्क मैदान देण्यात आले आहे. 23 आणि 24 ऑक्टोबर असे हे दोन दिवस आहेत.

दोन दिवस आणि 18 अटी

मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान दोन दिवसांसाठी दिलेले असले तरी त्त्यात 18 अटी घालण्यात आल्या आहेत. यात पहिली अट वेळेची आहे. दुसरी महत्त्वाची अट ध्वनी प्रदूषण टाळण्याची आहे. या शिवाय वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र, कोर्टाच्या अटीशर्थींचे पालन, पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी, मैदानात वाहनांना घातलेली प्रवेशबंदी अशा विविध 18 अटी आहेत.

हे ही वाचा 

100 कोटी वसुली करणारा गृहमंत्रीच का आवडतो..चित्रा वाघ सुप्रिया सुळेंबद्दल अशा का बोलल्या?

‘नरेंद्र मोदी बापात बाप लेकात लेक ठेवणार नाहीत,’ प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

महिलांनो आता रस्त्यावर उतरा…असे का म्हणाले शरद पवार

अवघे 250 रुपये भाडे

या शिवाजी पार्कसाठी किती भाडे भरावे लागते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याचे उत्तर अगदी सोपे आहे. शिवाजी पार्कचे दिवसाचे भाडे आहे अवघे 250 रुपये. शिवाय जीएसटी. या शिवाय 20 हजार रुपये अनामत भरायची असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी