27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रयेवा टोल आपलोच असा , ओसरगावमधील टोलनाक्यावरुन वाद, नेमकं काय आहे प्रकरण

येवा टोल आपलोच असा , ओसरगावमधील टोलनाक्यावरुन वाद, नेमकं काय आहे प्रकरण

मु्ंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरी करण्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. महामार्गावर टोल नाका सुरु करणार आहे.राष्ट्रीय महामार्ग 66 ची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत मात्र असे असताना ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरू होणार आहे. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळावी तरच हा टोल नाका सुरु करु असा इशारा सर्वपक्षीय त्यांनी दिला आहे. आमदार वैभव नाईक हे सकाळी 10 वाजता येऊन त्यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.सिंधुदुर्गवासियांसाठी संपूर्ण टोल माफी करण्याच्या मागणीवर टोलविरोधी कृती आक्रमक असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणानं टोल वसुली करणार असल्याचं जाहीर केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हायातील जानवली ते पत्रादेवी पर्यंत 60 किमी लांबीच्या मार्गासाठी टोल वसूल करणार आहे.

ओसरगावमध्ये तणावाच्या स्थितीची शक्यता होती. या टोल नाक्याचे वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या राजस्थानातील कंपनीला दिले आहे. हा टोल नाका 14 जूनपासून टोल वसुलीसाठी सुरु करणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायाच्या वाहनांसाठी शुल्क 50 टक्के सवलत आहे. तर खासगी अव्यावसायिक वाहनांना महिन्यासाठी 330 रुपयांचा पास आहे. ओसरगाव टोल नाका हा याआधी तिनदा टोलनाका सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. इतर सर्व पक्षांचा टोलला विरोध आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टोलला याआधीच समर्थन दिलं आहे.

हे सुध्दा वाचा:

मुंब्रा धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेशचा सरकारचा बदनामीचा कट; डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

चंद्रकांत पाटलांचे मोठे पाऊल, महाविद्यालातून मिळणार शेअर बाजाराचे प्रशिक्षण !

शेतकरी आंदोलनावेळी सरकारचा ट्विटरवर दबाव; माजी सीईओच्या आरोपानंतर राजकारण तापले

ओसरगाव टोलनाक्यावरील वसुलीचे वाहनांसाठी नवीन दर असतील. मोटार, जीप आणि हलक्या वाहनांसाठी 95 रुपये, मिनी बस आणि व्यावसायिक वाहनांसाठी 155 रुपये आहे. त्यामुळे कोकणातील रिक्षा चालकांना या टोल वसुलीतून दिलासा मिळालाय. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी