32 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री सुभाष देसाईंनी तळीये गावाला दिली भेट, मृतांच्या नातलगांचे केले सांत्वन

मंत्री सुभाष देसाईंनी तळीये गावाला दिली भेट, मृतांच्या नातलगांचे केले सांत्वन

 

टीम लय भारी,

राज्याचे उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त तळीये गावाची पाहणी केली. त्यांनी पीडित नागरिकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. (Subhash desai visited taliye village)

आतिवृष्टिमुळे तळीये गावावर डोंगर कोसळून अनेक कुटुंबे जमिनदोस्त झाली. कित्येक संसार मोडले, निष्पाप लहान- थोरांचे जीव देखिल गेले. अद्याप काही जण हे ढिगाऱ्याखाली फसलेले असून, त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी

Subhash
मंत्री सुभाष देसाईंनी तळीये गावाला दिली भेट, मृतांच्या नातलगांचे केले सांत्वान

मंत्री सुभाष देसाईंनी तळीये गावाला दिली भेट, मृतांच्या नातलगांचे केले सांत्वन

भारताच्या युवा नेमबाजांना ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाली निराशा

निसर्गाच्या विकोपामुळे उद्ध्वस्त झालेल्या या गावातील आपत्तीग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करून त्यांना मदतीचा हात सरकारने पुढे केला आहे. शासन पीडित नागरिकांच्या कुटुंबीयांसोबत असुन त्यांना सर्वोत्परी मदत केली जाईल. तसेच गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल.” असे आश्वासन राज्यमंत्री श्री. देसाई यांनी म्हंटले आहे. (Government standing strong behind taliye village people)

मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुध्दा ह्या गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी, या उद्ध्वस्त झालेल्या गावाचे पुनर्वसन करण्याचे आवाहन दिले आहे. तर, तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी महाडाने स्वीकारली आहे. (Mhada to take responsibility of relocation of village)

आदित्य ठाकरेंनी आदिवासींच्या उन्नतीसाठी दिला ‘शब्द

Maha flood fury: Over 100 killed, thousands evacuated; CM visits affected areas

आतापर्यंत, या आपत्ती मधे तळीये गावात ४२ जणांचा मृत्यू झाला असुन, ४० जणांचा शोध अजुन सुरू आहे. एनडीआरफ चे पथक या सगळ्यांचा शोध घेत आहेत. बचाव कार्य करण्याचे काम वेगात सुरू आहे.

मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून असुन संपूर्ण प्रशासन मदतीसाठी उतरले आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाच्या भेटीत, राज्याला सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी