31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रएकाच घरातील सहाजणांचा मृत्यू, नातलगांचा हंबरडा ऐकून उपस्थितांचीही मने हेलावली

एकाच घरातील सहाजणांचा मृत्यू, नातलगांचा हंबरडा ऐकून उपस्थितांचीही मने हेलावली

टीम लय भारी

सातारा : सततच्या मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली. एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. (Landslide in aambeghar)

एनडीआरएफची टीम ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे देखील घटनास्थळी दाखल होते. (NDRF team working hard to rescue people)

मंत्री सुभाष देसाईंनी तळीये गावाला दिली भेट, मृतांच्या नातलगांचे केले सांत्वन

Landslide
एकाच घरातील सहाजणांचा मृत्यू, नातलगांचा हंबरडा ऐकून उपस्थितांचीही मने हेलावली

भारताच्या युवा नेमबाजांना ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाली निराशा

पाऊस थांबल्यामुळे ढिगाऱ्याखाली दबलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले होते. यावेळी एकाच घरातील सहा मृतदेह बाहेर काढून त्यांना मुखाअग्नी देण्यात आला. प्राप्त परिस्थितीमुळे प्रशासनाला या मृतदेहांना एकाच चितेवर मुखाअग्नी देण्यात आला. मृतांच्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना दुःख अनावर झाले होते. (6 dead in same family)

याठिकाणी ढिागाऱ्याखाली एकूण तीन घरे गाडली गेली होती. ज्यामध्ये १० ते १५ पेक्षा अधिक जण दबली गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आंबेघरमधील मृतांचा आकडा 15 पर्यंत वाढेल, मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

Maha flood fury: Over 100 killed, thousands evacuated; CM visits affected areas

पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले तर काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण होत होता. त्यानंतर ढिागाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम युद्धपातळीवर काम करत आहे.

दुसरीकडे पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिाऱ्याखाली काही लोक अडकले गेल्याचे सांगण्यात आले. तसेच पाटण तालुक्यात आंबेघर , ढोकावळे , मोरगिरी , कामरगाव गुंजाळी , काठेवाडी , टोळेवाडी , कातवडी- मेष्टेवाडी इत्यादी अनेक ठिकाणी डोंगर – दरडी कोसळले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी