29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानेच दिली होती मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी;...

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानेच दिली होती मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; वाचा काय होती त्याची मागणी

अहमदनगरच्या पोलीस हेल्प लाईन क्रमांकावर गुरुवारी एक फोन खणाणला, फोनवरील व्यक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे करुन द्या नाहीतर मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी अहमदनगर पोलिसांना दिली होती. त्यानंतर व्यक्तीचा शोध घेतला असता हा व्यक्ती स्पर्धा परिक्षांची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संबंधीत आरोपीला अटक केली असून तो अहमदनगर जिल्ह्यातील आहे.

काल अहमदगर पोलिसांना हेल्पलाईन क्रमांकावर मंत्रायल उडवून देऊ अशा धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी सतर्क होत, मुंबई पोलिसांना याबाबत तातडीने कळविले. मुंबई पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत मंत्रालयात शोधमोहीम राबिवली. तेव्हा मंत्रालयात स्फोटके नसल्याचे आढळून आल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा तपास अहमदनगर पोलिसांनी सुरु केला.

हे सुद्धा वाचा 
आलियाच्या ‘त्या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
ताज हॉटेल उडवून देण्यासाठी पाकिस्तानातून दोघेजण येत आहेत; मुंबई पोलिसांना धमकी
आत्ता ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’? मोदींची नवी खेळी

दरम्यान अहमदनगर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला शोधून काढले असून त्याला अटक केली आहे. आरोपी तरुण हा अहमदनगर जिह्यातील शेवगाव तालुक्यातील रहिवासी आहे. बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे या 34 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. स्पर्धा परिक्षा पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी या तरुणाला मुख्यमंत्र्यांसोबत बोलायचे होते. मात्र त्यांच्याशी बोलणे न झाल्यामुळे तरुणाने अहमदनगर पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणे करुन द्या अन्यथा मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी त्याने दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी