31 C
Mumbai
Friday, September 1, 2023
घरमनोरंजनआलियाच्या 'त्या' फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

आलियाच्या ‘त्या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

(नेत्वा धुरी)

‘गंगुबाई काठेवाडी’ चित्रपटासाठी थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी चुलबुली गर्ल अर्थात अभिनेत्री आलिया भट कालपासून वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. आलियानं ‘वेग’ या प्रसिद्ध मॅगझिनसाठी नुकतंच कव्हर फोटो शूट केलं. आलियाचे फोटो प्रसिद्ध होतास नेटीजन्सला तिला ओळखताच आलं नाही. आलियाच्या ‘त्या’ फोटोंने सोशल मीडियावर मात्र चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आलियानं कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्याची चर्चा रंगतेय.

आलिया आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज होतेय. नेटफ्लिक्सवर ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटात आलिया नकारात्मक भूमिका साकारतेय. ती ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या प्रचारात पूर्णपणे गुंतली आहे. आलियानं थायलंड देशातील वेग मॅगझिनसाठी फोटोशूट केलं. फोटोशूटमधील आलियाचा चेहरा चपटा झाल्याचे दिसून आले. ‘वेग’ मॅगझीन आपल्या अधिकृत इंस्टाग्रामअकाउंटवर आलियाचे तीन फोटो प्रसिद्ध केले.

आलियाचे तिन्ही फोटो वायरल होताच फॅन्सला आश्चर्याचा धक्का बसला. आलिया आलियासारखी दिसत नाही, फोटोतील मुलगी आलिया नाही, तू तुझ्या चेहऱ्यावर नेमकं काय केलं? अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. फोटोत आलीयाला टॅग केले नसते तर ओळखणे कठीणच होते अशी मिश्किल प्रतिक्रियाही एकानं दिली. आलियाचा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं तयार केला असावा, असेही नेटीझन्स म्हणाले. यावर आलिया भटने अद्यापही कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी झाला. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी असल्याने तिचा लहानपणापासूनच चित्रपट जगताकडे कल होता. जमनाबाई नरसी शाळेतून तिचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागले. आलिया भट्टने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच तिला स्टुडंट ऑफ द इयरची ऑफर आली आणि तिने आपले शिक्षण सोडले. पण कॉलेज अर्धवट सोडले असले तरी ती कमी वयात कोट्यधीश आहे. मुंबईमध्ये तिने तिचे स्वतःचे घर घेतले आहे.
हे सुद्धा वाचा
सप्टेंबर महिन्यातले ‘हे’ सण तुमचे पाकीट खाली करणार….
आत्ता ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’? मोदींची नवी खेळी
पोलिसांनीच केली चोरी!

कॉलेज लाईफ जगू शकली नसलेली आलिया भट  मात्र  कॉलेज लाईफवरच बनवलेल्या  ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या बॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आली. तेव्हापासून तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दरम्यान त्याआधी अवघ्या सहा वर्षांची असताना तिने ‘संघर्ष’ सिनेमात प्रीती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्याचवेळी, तिने स्टुडंट ऑफ द इअरमधून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने हायवे, २ स्टेट्स आणि हम्प्टी शर्मा की दुल्हनिया यांसारख्या सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना वेड लावले. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात तर तिची पूर्णपणे वेगळी शैली होती. वडील महेश भट्ट यांच्या संपर्कात राहून ती अकालीच प्रौढ, कसलेल्या कलाकारासारख्या भूमिका रंगवत आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी