31 C
Mumbai
Friday, September 1, 2023
घरक्राईमताज हॉटेल उडवून देण्यासाठी पाकिस्तानातून दोघेजण येत आहेत; मुंबई पोलिसांना धमकी

ताज हॉटेल उडवून देण्यासाठी पाकिस्तानातून दोघेजण येत आहेत; मुंबई पोलिसांना धमकी

मंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल उडवून देण्यासाठी पाकिस्तानातून दोघेजण मुंबईत येत असल्याचा धमकीचा फोन गुरुवारी मुंबई पोलिसांना आला. पाकिस्तानातून दोघे जण सागरी मार्गाने मुंबईत येत असून ते ताज हॉटेल उडवून देणार आहेत अशी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करुन धमकी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने पोलिसांना मुकेश सिंह असे आपले नाव असल्याचे सांगितले होते. धमकीच्या फोनची तातडीने दखल घेत मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. धमकीचा फोन करणाऱ्याने आपली खोटी ओळख पोलिसांना सांगितली होती. त्याचे खरे नाव जगदंबा प्रसाद सिंह असल्याचे तपासात समोर आले. हा व्यक्ती उत्तर प्रदेशातील गोंडा येथील मुळचा रहिवासी असून त्याचे वय 35 वर्षे आहे. तो सध्या मुंबईतील सांताक्रझ येथे वास्तव्यास आहे.

दरम्यान जगदंबा प्रसाद याने दारुच्या नशेत होऊन पोसिलांना फोन केला होता. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. या व्यक्तीवर पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सन 2008 साली मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्यात अनेक नागरिकांचा, पोलिसांचा बळी गेला होता. संपूर्ण जगाने ही दहशत पाहिली होती. यावेळी अफजल कसाबला जिवंत पकडून पोलिसांनी पाकिस्तानचा दहशतीचा चेहरा समोर आणला होता.

हे सुद्धा वाचा 
आत्ता ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’? मोदींची नवी खेळी
सप्टेंबर महिन्यातले ‘हे’ सण तुमचे पाकीट खाली करणार….
ठाकरे गटाचा नेता बैठकीला जातो असे सांगून गेला; रेल्वे रुळावर आढळा छनविछिन्न मृतदेह

या पूर्वी देखील पोलिसांना अनेकदा असे फोन आले होते. पोलिसांनी तातडीने तपास करत अशा घटना उघडकीस देखील आणल्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी देखील पोलिसांना मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता. पोलिसांनी या फोनचा तपास केला असता एका अल्पवयीन मुलाने हा फोन केल्याचे तपासात समोर आले होते.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी