30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रतेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या चरणी, मंत्रिमंडळासह घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या चरणी, मंत्रिमंडळासह घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आहे. मंदिर समितीने मुख्यमंत्री राव यांचा सत्कार केला. यावेळी दर्शन रांगेतील भाविकांना त्रास होऊ नये म्हणून अवघ्या दहा मिनिटातच दर्शन घेऊन पुन्हा दर्शन रांग पूर्ववत केली अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह. भ. प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

के. चंद्रशेखर राव काल सोलापूरमध्ये त्यांच्या मंत्री मंडळासोबत दाखल झाले होते. तेलंगणातून तब्बल 600 गाड्यांचा ताफा त्यांच्या सोबत महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आज सकाळी केसीआर यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाला होता. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतले आहे. केसीआर यांच्यासह आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेतले आहे. पालखी निमित्त मंदिर परिसरातील गर्दीमुळे विठ्ठल मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा:

पंतप्रधानाच्या हस्ते आज 5 वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्धाटन

मुंबई, ठाणे, पालघर साठी ऑरेंज अलर्ट; आयएमडीचा इशारा

सैनिक प्रवेश परिक्षेत राजवर्धन भानुसेचा अटकेपार झेंडा

पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर केसीआर यांचा ताफा पंढरपूरहून सरकोलीच्या दिशेने निघाला आहे. सरकोली येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासाठीसाठी ते हजर राहणार आहेत. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा BRS मध्ये प्रवेश होणार आहे. केसीआर यांच्या स्वागतासाठी गुलाबाच्या पायघड्या आणि अबकी बार किसान सरकार रंगोळीतून संदेश देण्यात आला आहे. भगीरत भालके यांनी जय्यत तयारी केली आहे. केसीआर यांचे विठ्ठल-रखुमाईची मूर्ती, टाळ-चिपळ्या, तुळशीहार, वीणा देऊन स्वागत केले जाणार आहे. त्याच बरोबर सर्व मंत्री आणि आमदारांनाही विठ्ठलाची मूर्ती दिली जाणार आहे. या मेळाव्यात के. चंद्रशेखर राव काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी