28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार नेहमी वचनबध्द ; बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार नेहमी वचनबध्द ; बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी ८ मार्च रोजी २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. १० हजार २२६ कोटी महसुली तुटीचा, तर ६६ हजार ६४१ कोटी रूपयांचा राजकोषीय तुटीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सर्व समाज घटक आणि विभांगाना न्याय दिला आहे, त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकासाला फायदा होणार आहे. निळवंडेच्या कामासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे निळवंडे कृषी समितीच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्याच्या वेळी कृषी समीतीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधार गमे, गोपीनाथ घोरपडे दादासाहेब पवार, उत्तमराव घोरपडे, लताताई डांगे, डॉ. एकनाथ गोंदकर, रावसाहेब बोठे, श्रीकांत मापारी, डॉ. रवींद्र गागरे, रवींद्र गागरे, रवींद्र वर्पे, रावसाहेब कोल्हे, धनंजय वर्पे, शहाजी गांगवे, जालिंदर लांडे, सोपान जोंधळे, मच्छिंद्र एलम, अशोक खंडांगळे इत्यादी मान्यावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात म्हणाले की, या कामासाठी आमच्या सरकारने निधी मंजुर केल्याने कोण खरे आणि कोण खोटे हे जनतेला कळाले आहे. सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच वचनबध्द आहे. भाजप सरकारने फक्त फसविण्याचे काम केले. परंतु आम्ही प्रत्यक्षात काम करत आहोत. निळवंडेच्या कामासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असून २०२२ च्या पावसाळ्यातील धरणात साठलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचविण्याचा प्रयत्न आमचे सरकार करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी