31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeक्राईमअबब,सुरक्षा रक्षक एका दिवसात कमवायचा साढे तीन कोटी, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अबब,सुरक्षा रक्षक एका दिवसात कमवायचा साढे तीन कोटी, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एक सेक्युरिटी गार्ड दिवसाला तीन ते साढे तीन कोटी रुपये कमवायचा.हे ऐकून आश्चर्य वाटेल.पण हे खरं आहे.सेक्युरिटीच काम करता करता त्याने सायबर गुन्हे करायला ही सुरवात केली.यानंतर या गुन्ह्यातून दिवसाला तीन ते साढे तीन कोटी रुपये कमावण्याच टार्गेट असायच आणि तो ते पूर्ण करायचा.

गोरेगाव येथील बांगुरुनगर पोलिसांनी एक कारवाई केली आहे.पाच जणांना अटक करण्यात आली आहे.हे सर्व सायबर गुन्हेगार आहेत. श्रीनिवास राव उर्फ दाढी ,महेंद्र रोकडे , मुकेश दिवे , संजय मंडळ आणि अनिमेश वैद्य या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.रोकडे आणि दिवे यांना टिटवाळा येथून तर मंडल आणि वैद्य यांना कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे.या गँगचा प्रमुख श्रीनिवास हा आहे.त्याला विशाखापट्टणम येथील एका 5स्टार हॉटेलातून अटक करण्यात आली आहे.

गँगचा प्रमुख श्रीनिवास हा केवळ 12 वी पास आहे. त्याने शिक्षण अधर्वट सोडलं आहे.त्यानंतर तो सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा. त्यानंतर तो सायबर गुन्हे करायला लागला.देश पातळीवर त्याच काम चालायचं.लोकांना फोन करायचा. आपण पोलीस बोलत आहोत.तुमचं एक पार्सल आलं आहे.त्यात ड्रग्स आहे.अशी धमकी द्यायचा. यानंतर समोरच्या व्यक्तीच्या मोबाईल मध्ये रिमोटने प्रवेश करायचा.आणि सर्व माहिती मिळवून त्या द्वारे बँक खात्यातून सर्व पैसे लंपास करायचा.

हे पैसे तो क्रिप्टो करन्सी मध्ये बदलायचा.त्यानंतर ती करन्सी एका चायनिस व्यक्तीस पाठवायचा. श्रीनिवासने त्याच्या बायकोच्या खात्यात 25 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत.यामुळे आता त्याच्या कुटुंबाची ही चौकशी केली जात आहे. सुमारे 40 बँक खात्यांची माहिती तपासात उघडकीस आली आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपला सुरूंग लावण्यासाठी महादेव जानकर यांनी तयार केला रोडमॅप !

महादेव जानकरांनी चांगल्या राजकारण्यांची यादी सांगितली, पण फडणविसांचा उल्लेखही केला नाही !

नवाब मलिक दहशदवाद प्रकरण बॉंबस्फोटचा आरोपी बनणार माफीचा साक्षीदार

या गँगच दिवसाला कोट्यवधी रुपये कमावण्याचे टार्गेट असल्याचं.आणि मग त्या अनुषंगाने त्यांचं काम चालायचं.तेवढं टार्गेट ते पूर्ण करायचे.गेल्या तीन चार वर्षापासून ही गँग सक्रिय आहे.कारवाई च्या वेळी सुमारे दीड कोटी रुपये आणि 40 बँक खात्याची माहिती सापडली आहे.अजून महत्वाची माहिती उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

the security guard used to earn three and a half crores in a day.
The police smiled

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी