29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयभाजपला सुरूंग लावण्यासाठी महादेव जानकर यांनी तयार केला रोडमॅप !

भाजपला सुरूंग लावण्यासाठी महादेव जानकर यांनी तयार केला रोडमॅप !

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढून भाजपला त्यांची जागा दाखवून देण्याचा रोडमॅप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी तयार केला आहे. राज्यात आणि देशात रासपला "किंगमेकर" पक्ष बनविण्याचा निर्धारही जानकर यांनी बोलून दाखविला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढून भाजपला त्यांची जागा दाखवून देण्याचा रोडमॅप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी तयार केला आहे. राज्यात आणि देशात रासपला “किंगमेकर” पक्ष बनविण्याचा निर्धारही जानकर यांनी बोलून दाखविला.

महादेव जानकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त रासप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात २ लाख ५५ हजार रुपयांच्या नोटांचा हार घालून त्यांचा सत्कार केला. २८८ विधानसभा मतदारसंघापैकी २०० मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून जानकर यांना पक्षनिधी सोपविण्यात आला. वयाच्या ३१ व्या वर्षांपासून वाढदिवसाला माझे कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी निधी गोळा करून माझ्याकडे सुपूर्द करतात. यंदाच्या वाढदिवसाला पक्षासाठी ५ लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

जानकर म्हणाले, आगामी महापालिका, नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला थोडा उशीर असला तरीही आमची पक्षबांधणी जोरात सुरू आहे. राज्यात ९० हजार मतदान बूथ आहेत. त्यापैकी ३० हजार बुथपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. या बुथवर आमच्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आहे. उरलेल्या ६० हजार मतदान बुथवर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.

” आपल्या चौकात, आपली औकात हे मिशन ठरवून कार्यकर्ते जोमाने कामाला भिडले आहेत. भाजप असो वा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष निवडणुकीत युती अथवा आघाडीसाठी आम्हाला सोबत घ्या, म्हणून आम्ही त्यांच्या मागे जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद आम्ही दाखवून देऊ. त्यांना आमच्या पक्षाची गरज असेल तर तेच आमच्याकडे येतील. आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महादेव जानकरांनी चांगल्या राजकारण्यांची यादी सांगितली, पण फडणविसांचा उल्लेखही केला नाही !

महादेव जानकरांना शरद पवारांविषयी आदर, महाराष्ट्र भूमीसाठी राजकारणात सक्रीय राहण्याचे केले आवाहन !

उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना फुटली; शरद पवारांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर वाढणारा पक्ष आहे. आज चार राज्यांमध्ये पक्षाला मान्यता मिळाली आहे. गुजरातमध्ये रासपचे ४० नगरसेवक आहेत. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत आम्ही ११० उमेदवार उभे केले होते. त्यातील एकही निवडून आला नसला तरीही मतांची टक्केवारी वाढली आहे. बंगलोरमध्ये पक्षाचा उमेदवार उभा केला असून तिथे प्रचार सुरू असल्याचे जानकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी