28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमहादेव जानकरांनी चांगल्या राजकारण्यांची यादी सांगितली, पण फडणविसांचा उल्लेखही केला नाही !

महादेव जानकरांनी चांगल्या राजकारण्यांची यादी सांगितली, पण फडणविसांचा उल्लेखही केला नाही !

आगामी निवडणुका स्वबळावर लढू, असा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. देश आणि राज्यातील मोठ्या नेत्यांची नावे सांगताना भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळला. त्यामुळे फडणवीस यांच्याबद्दल जानकर यांच्या मनात नाराजी असल्याचे दिसून आले.

“आपल्या चौकात आपली औकात” हे ध्यानात ठेवून आम्ही पक्षाची बांधणी करीत आहोत. कार्यकर्त्यांच्या जीवावर हा पक्ष उभा असून युती अथवा आघाडीसाठी दुसऱ्या पक्षांच्या मागे लागणार नाही. आगामी निवडणुका स्वबळावर लढू, असा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. देश आणि राज्यातील मोठ्या नेत्यांची नावे सांगताना भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळला. त्यामुळे फडणवीस यांच्याबद्दल जानकर यांच्या मनात नाराजी असल्याचे दिसून आले.

भाजप असो वा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा गट निवडणुकीत युती अथवा आघाडीसाठी आम्हाला सोबत घ्या म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागणार नाही. स्वबळावर लढून आमची ताकद दाखवून देणार असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रीय समाज पक्ष हा कार्यकर्त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर चालत असल्याचे स्पष्ट करताना जानकर यांनी देशातील मोठ्या पक्षांमध्ये काम करणाऱ्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला. राहुल गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा पक्ष चालविण्याचा मार्ग मोठा आहे. आम्ही अगदी छोट्या मार्गातून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावेळी जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला.

हे सुद्धा वाचा : 

महादेव जानकरांना शरद पवारांविषयी आदर, महाराष्ट्र भूमीसाठी राजकारणात सक्रीय राहण्याचे केले आवाहन !

राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा सुप्रिया सुळे? 15 दिवसांपासून पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न

शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना जानकर म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत. देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची गरज आहे. त्यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते विरोध करतील. त्यामुळे शरद पवार राजकारणातून बाहेर जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी